मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिनं गलवान खोऱ्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. सोशल मीडियावर तर अत्यंत वाईट पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे. आता बॉलिवूडमधील कलाकारांनीही रिचावर टीका केली आहे. अक्षय कुमार, के के मेनन यांच्यापाठोपाठ आता अनुपम खेर यांनी देखील याप्रकणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रिचानं जे काही केलं ते अत्यंत लज्जास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले अनुपम खेर

अनुपम खेर यांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘काही लोकांना देशाचा अपमान करत प्रसिद्ध मिळवण्याची सवय असते. अशी लोक भेकड आणि हीन मनोवृत्तीची असतात. लष्काराची प्रतिष्ठा पणाला लावणं…यापेक्षा लज्जास्पद काहीच असू शकत नाही…’

https://twitter.com/AnupamPKher/status/1596072494863069184?s=20&t=5V474-5be76uhOSLWuyU5Q

अनुपम यांनी केलेल्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्यांच्या बाजूनं मत व्यक्त केली आहेत. हे लिहून तुमच्याबद्दलचा अभिमान वाढला असल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अक्षय कुमारनंही व्यक्त केली नाराजी

रिचा चढ्ढाच्या वादग्रस्त ट्विटवर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानंही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यानं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘हे पाहून मला खूप दुःख झालंय. आपल्या लष्कराबद्दल कृतघ्नता राहणं योग्य नाही. त्यांच्यामुळेच आपण आहोत.’ या ट्विटच्या शेवटी अक्षयनं हात जोडल्याचा इमोजीही शेअर केला आहे. अक्षयच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबा देणाऱ्या कॉमेन्ट केल्या आहेत.


के के मेननही झाला नाराज

के के मेनन यानं देखील रिचाच्या या ट्विटवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘ आपल्या देशाच्या आणि इथल्या नागरिकाच्या सुरक्षेसाठी गणवेश घालून शूरवीर सैनिकांनी त्यांच्या जीवाची बाजी लावली आहे. अशा शूरवीरांबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर आणि सन्मानाची भावना ठेवायला हवी, किमान इतकं तरी प्रत्येकानं करायला हवं…’

दरम्यान, वादग्रस्त ट्विटप्रकरणी रिचानं माफी मागितली आहे. तरी देखील तिच्यावरचा नेटकऱ्यांचा आणि कलाकारांचा रोष कमी झालेला नाही.

काय घडलं होतं नेमकं?

उत्तर आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी (२२ नोव्हेंबर) एका निवेदनात म्हटलं होतं की, सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत घेण्यास ते तयार आहेत. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रिचा चड्ढा ने लिहिलं की, ‘गलवान हाय बोलत आहे.’ रिचाच्या या ट्विटनं खळबळ उडाली. अनेकांनी रिचानं भारतीय लष्काराचा अपमान केल्याचं म्हटलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *