Raju Srivastava Love Story : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर रोजी निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 40 दिवसांपासून ते इस्पितळात दाखल होते. जिममध्ये व्यायाम करत असताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आलेला. राजू यांनी आपल्या मागे पत्नी आणि मुले सोडून गेले आहेत. शिखा श्रीवास्तव यांना त्यांच्या पतीच्या बरे होण्याची पूर्ण आशा होती, परंतु तसे काहीच झाले नाही. बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या पतीचा विरह सहन करवा लागला. आपल्या जोडीदाराला गमवणे ही सर्वात मोठी गोष्टी असू शकते. आपल्या आयुष्यातील जोडीदाराला गमवण याहून दुसरं दु:ख असू शकत नाही. पण एवढ्या दु:खातून त्यांनी हिम्मत करुन वाट काढली.
(फोटो सौजन्य : Instagram @ mandirabedi, @ irrfan, @neetu54)

​मंदिरा बेदी

अभिनेत्री मंदिरा बेदीनी 30 जून 2021 रोजी तिचा जोडीदार राज कौशल यांना गमावले. वयाच्या 49 वर्षीय राज यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आयुष्यातील या अचानक आलेल्या वादळाने अभिनेत्रीचे संपूर्ण जग बदलून टाकले. तिचे दु:ख व्यक्त करण्यासाठी ती आजही भावनिक पोस्ट टाकत असते, यावरून पती गमावल्याचे दुःख तिच्या मनात कसे कायम आहे हे दिसून येते. पण दु:खाला कवटाळून बसण्यापेक्षा तिने त्यामधून निघण्याचा प्रयत्न करा.

(वाचा :- माझी कहाणी : माझं यश माझ्या नात्यातील सर्वात मोठी अडचण झाली आहे, मला काहीच कळत नाही आहे)

​सुतापा सिकंदर

बॉलिवूड अभिनेता इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचे निदान झाले. त्यानंतर या आजाराशी प्रदीर्घ लढाई केल्यानंतरही आणि वेदनादायक उपचारानंतरही तो वाचू शकला नाही. 29 एप्रिल 2020 रोजी इरफानने जगाचा निरोप घेतला. यावेळी सुतापा सिकंदर या एकट्या पडल्या होत्या.

(वाचा :- प्रेमासाठी वाट्टेल ते! राणी एलिझाबेथसाठी प्रिन्स फिलिपने सोडला होता राजपाट… या लव्हस्टोरीतून तुम्ही काय शिकणार?)

​नीतू कपूर

ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेत कर्करोगावर उपचार सुरू होते. त्यांच्या तब्बेतीमध्ये बदल दिसत होता त्यावेळी सर्वांना वाटले की आता सर्व काही ठीक होईल, परंतु 30 एप्रिल 2020 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची पत्नी नीतू कपूर आजही त्यांच्या आठवणीमध्ये असलेल्या दिसून येतात. प्रत्येक वेळी त्या ऋषी कपूरच्या आठवणीत असलेले पाहायला मिळतात. आपला जोडीदार गमवणे ही गोष्ट काय असते हे नीतू यांच्याकडे पाहून कळते.

(वाचा :- नोकरदार महिलांचे लग्न कसे टिकते? सुधा मूर्ती यांनी यशस्वी स्त्रियांच्या सुखी वैवाहिक जीवनाचे सांगितले रहस्य)

​अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की जेव्हा एखाद्या जोडीदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा त्या परिणाम दुसऱ्या व्यक्तीवर होतो. कधी कधी या वेदना शारीरिक असतात तर कधी मानसिक असतात. या काळात लोकांना झोप न लागणे, भूक न लागणे, लक्ष केंद्रित न करणे या गोष्टींना समोरे जावे लागते.

(वाचा :- ब्रेकअपनंतरही एक्सची आठवणीने असह्य त्रास होतोय?, जाणून घ्या यातून वेदनेतून कसं बाहेर पडावं)

​जवळच्या व्यक्तीचा आधार

कधीकधी जोडीदाराच्या मृत्यूमुळे दुसऱ्या व्यक्तीवर खूप परिणाम होतो. यासाठी समुपदेशन करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत व्यक्तीचे जवळचे मित्रही महत्त्वाची भूमिका बजावतात. जीवनसाथी गमावण्याच्या दु:खातून जात असलेल्या व्यक्तीला मजबूत सपोर्ट सिस्टमची गरज असते.

(वाचा :- Relationship tips : तुमच्या या 4 चुका तुमचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करतील, आजच सावध व्हा)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.