बोलणार एक आणि करणार एक हे माझ्या रक्तात नाही:पंकजा मुंडेंचे आष्टीमध्ये जोरदार भाषण, आमदार सुरेश धसांवरही लगावला टोला

बोलणार एक आणि करणार एक हे माझ्या रक्तात नाही:पंकजा मुंडेंचे आष्टीमध्ये जोरदार भाषण, आमदार सुरेश धसांवरही लगावला टोला

आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाषण केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमदार सुरेश धस यांना मिश्किल टोला देखील लगावला आहे. या जिल्ह्याचे आमदार ज्यांना 2009 मध्ये पहिला गुलाल लागला तो भारतीय जनता पक्षाकडूनच लागला ते आता पुन्हा 2024 मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि ज्यांनी या सभेचे आयोजन करण्यासाठी मोठा सहभाग घेतला आहे ते म्हणजे सुरेश धस, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांचा उल्लेख केला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल नेहमीच आदरभाव आहे. मात्र आज त्यांच्याबद्दल ममत्त्व भाव निर्माण होत असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आज फडणीसांना बाहुबली म्हणणारे पूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. त्यामुळे माझे वचनच माझे शासन आहे, असे देखील पंकजा यांनी म्हटले आहे. बोलणार एक आणि करणार एक हे माझ्या रक्तात नाही. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. हे लक्षात ठेवा, अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिले आहे. सुरेश धस यांना मी आज देखील अण्णाच म्हणते, असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडेंएवढा पहाडासारखा माणूस याच जिल्ह्याने महाराष्ट्राला दिल्याचेही सुरेश धस यांनी म्हटले. तसेच, शिरुर आणि पाटोदा तालुक्यासाठी आणखी 3.7 टीएमसी पाणी देण्याची मागणी केली. देवेंद्र बाहुबली हेच आमचं काम करु शकतात, तुमच्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे, असे म्हणत ही योजना मंजूर झाल्यास मी जिवंत राहिल किंवा नाही, पण या मतदारसंघातून भाजपचाच आमदार राहिल, असे आश्वासन आमदार सुरेश धस यांनी दिले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment