मिळालेल्या माहितीनुसार, विशाल संतोष ढगे (२२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून अजित साहेबराव मोंढवे हा तरुण यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साकोरे – वडगाव रोडवर हा अपघात घडला आहे. साकोरे येथील विशाल ढगे आणि अजित मोंढवे हे दोघे मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ते त्यांच्या वेळेत घरातून दुचाकी क्र एम एच १४. एच एफ ७७९४ घेऊन कामाला निघाले. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ते साकोरे वडगाव रोडने बंधाऱ्याजवळ आले. मात्र त्या ठिकाणी उभा केलेला मोकळा सिमेंट पोल अचानक त्यांच्या दुचाकीवर पडला. तो सिमेंट पोल अंगावर पडल्याने विशाल संतोष ढगे याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर अजित साहेबराव मोंढवे हा यात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मंचर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी घटनास्थळी कोणी नव्हते. त्यामुळे अपघातात नेमका कसा झाला. तो खांब कसा पडला हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र. त्या ठिकाणी उभा केलेला पोल कुठलाही आधार न देता उभा केलेला होता. मात्र रात्री झालेल्या पावसामुळे पोलच्या खालील मातीचा भराव वाहून गेल्याने हा पोल अंगावर पडल्याचे ढगे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.