मुंबई : आठवड्यापूर्वी बाईज ३ हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दोन सिनेमांच्या यशानंतर तिसऱ्या सिनेमाकडूनही अपेक्षा होत्याच. आता बाॅक्स ऑफिसवरचे आकडे पाहता, या अपेक्षा प्रचंड प्रमाणात पूर्ण झाल्या, असं म्हणता येईल. रिलीज झाल्यापासून सिनेमाची घोडदौड सुरूच आहे.

पुन्हा एकदा धैर्या, ढुंग्या आणि कबीरने अवघ्या महाराष्ट्रात धमाका केला आणि यावेळी या त्रिकुटाला साथ दिली ती बिनधास्त अशा कीर्तीने. अवधूत गुप्ते प्रस्तुत, विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज ३’ या सिनेमाला महाराष्ट्रभरात कमालीचा प्रतिसाद मिळतोय. आठवड्याभरात बॉक्स ऑफिसवर ‘बॉईज ३’ने ४.९६ कोटींची तुफान कमाई केली आहे. एकदंरच सध्याचं चित्र पाहता या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर असे अनेक मजबूत विकेंड मिळण्याची अपेक्षा आहे.

कोल्हापूरच्या ‘गाव की गोरी’चीच चर्चा, बिग बॉस फेम अभिनेत्रींच्या ग्लॅमरस अदा

तरुणांमध्ये ‘बॉईज ३’ची भलतीच क्रेझ दिसत असून चित्रपटगृहांमध्ये याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. अगदी सकाळचे शोजही ‘हाऊसफुल्ल’ झाले आहेत. तरुणांसोबतच कुटुंबीयही हा चित्रपट एन्जॉय करत आहेत. डायलॉगपासून गाण्यांपर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत.

सिनेमाला मिळणाऱ्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल प्रस्तुतकर्ते आणि संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते म्हणतात, ” सध्या आमची ‘बॉईज’ची टीम अवघ्या महाराष्ट्रात फिरत आहे आणि तिथून मिळणारा प्रतिसाद, प्रेम पाहाता चित्रपटाच्या सर्व टीमच्या मेहनतीचे चीज झाल्याचं समाधान मिळतंय. ‘बॉईज १’, ‘बॉईज २’ ला मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम आता ‘बॉईज ३’ ला तिपटीने वाढलं आहे. ‘बॉईज’ची ही धमाल आता लवकरच चौपट होणार आहे. या सिनेमातच ‘बॉईज ४’ ची घोषणा आम्ही केली असून ‘बॉईज ४’लाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल, अशी मला खात्री आहे.”

यात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मराठी सिनेमांचे अनेक भाग हल्ली काढले जातात. मुंबई पुणे मुंबई, टाईमपास ही त्यांची उदाहरणं आहेत. आणि हे यशस्वीही होतात, हे दिसतंय.

Video : मुक्ता बर्वेला श्रेयस तळपदेही घाबरतो, ऐका अभिनेत्रीच्याच तोंडून!

कोकणातल्या वातावरणाची एनर्जी शुटिंगमध्ये दिसून येते | विक्रम गायकवाडSource link

Leave a Reply

Your email address will not be published.