लाडक्या बहिणींना 29 सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता:रायगड येथील कार्यक्रमातून होणार वितरण, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

लाडक्या बहिणींना 29 सप्टेंबरला मिळणार तिसरा हप्ता:रायगड येथील कार्यक्रमातून होणार वितरण, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते याआधी मिळाले आहेत. आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता मिळणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमातून सुमोर 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे. मागील दोन महिन्यांत काही अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना थेट खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. आतापर्यंत दोन हप्त्यांचे झाले वितरण सरकारने याआधी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला होता. यावेळी योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना दोन महिन्यांचे 3000 रूपये एकत्रच आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या कार्यक्रमातून योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. तर आता 29 सप्टेंबर रोजी रायगड येथील तिसऱ्या कार्यक्रमातून योजनेच्या तिसऱ्या हप्ता वितरीत केला जाणार आहे. 29 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. ज्या महिलांचा अर्ज भरायचा बाकी आहे किंवा ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी निघाल्या अशा महिलांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. काय आहे लाडकी बहीण योजना राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रूपये असा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे. तसेच विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

​राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते याआधी मिळाले आहेत. आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी माहिती दिली आहे. योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता मिळणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. राज्य सरकारच्या वतीने 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमातून सुमोर 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार आहे. मागील दोन महिन्यांत काही अर्जात त्रुटी राहिल्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या. त्यामुळे या तिसऱ्या हप्त्यात वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना थेट खात्यात पैसे जमा केले जातील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. आतापर्यंत दोन हप्त्यांचे झाले वितरण सरकारने याआधी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ केला होता. यावेळी योजनेसाठी पात्र ठरलेल्या काही महिलांना दोन महिन्यांचे 3000 रूपये एकत्रच आले होते. नागपूर येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या कार्यक्रमातून योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. तर आता 29 सप्टेंबर रोजी रायगड येथील तिसऱ्या कार्यक्रमातून योजनेच्या तिसऱ्या हप्ता वितरीत केला जाणार आहे. 29 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. ज्या महिलांचा अर्ज भरायचा बाकी आहे किंवा ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी निघाल्या अशा महिलांना येत्या 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. काय आहे लाडकी बहीण योजना राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना 1500 रूपये असा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असावे. तसेच विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र आहेत.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment