नवी दिल्ली: Smartphone Deals: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू होण्याआधीच, फ्लिपकार्टवर अनेक सुपरहिट ऑफर देण्यात येत आहेत. Mid Range फोन्सपासून ते प्रीमियम ब्रँडच्या स्मार्टफोन्सपर्यंत, मोठ्या सवलती आणि अतिरिक्त ऑफर देत आहे. Flipkart च्या सेलमध्ये उपलब्ध सर्वोत्तम स्मार्टफोन डील, ज्या अंतर्गत तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत फोन घरी घेऊन जाऊ शकता. २३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणाऱ्या या सेलपूर्वी, तुम्ही तुमच्या आवडीचा फोन स्वस्तात कसा खरेदी करू शकता ते जाणून घ्या.

वाचा: ATM मधून पैसे काढताना ‘या’ चुका कराल तर अकाउंट होईल रिकामे, मिनिटांत गमवाल आयुष्यभराची कमाई

Samsung Galaxy S22 Plus 5G:

या सॅमसंग स्मार्टफोनचे 128GB मॉडेल १,०१,९९९ रुपयांना लिस्ट आहे परंतु सेल अंतर्गत ६९,९९९ रुपयांना विकले जात आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून, तुम्ही ३५०० रुपयांची सूट मिळवू शकता आणि एक्सचेंज ऑफरसह १९,००० रुपये वाचवू शकता. एकूणच हा फोन ४७,९९९ रुपयांना घेता येईल.

वाचा: Gaming Hackers: गेमर्सचाच गेम ओव्हर करतंय ‘हे’ मालवेयर, बँक अकाउंटवरही लक्ष, राहा सावध

Poco X4 Pro 5G: 6GB

हा 5G फोन २३,९९९ रुपयांऐवजी १६,४९९ रुपयांना विकला जात आहे. जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन खरेदी करून १५,९२० रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते आणि अशा प्रकारे POCO चा फोन ५७९ रुपयांना खरेदी करता येईल.

Oppo K10 5G:

Oppo चा हा 5G स्मार्टफोन १०,९९९ रुपयांऐवजी १६,४९९ रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरसह, तुम्ही १५,९२० रुपयांपर्यंत बचत करू शकता आणि जर तुम्हाला या ऑफरचा पूर्ण फायदा झाला, तर तुमच्यासाठी या फोनची किंमत ५७९ रुपये असेल.

Xiaomi 11i 5G:

२४,९९९ रुपयांना विकल्या जाणार्‍या या स्मार्टफोनची किंमत २९,९९९ रुपये आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही १२५० रुपयांपर्यंत बचत करू शकता. जुन्या फोनच्या बदल्यात हे खरेदी करून तुम्ही २२ हजार रुपये वाचवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हा फोन १,७४९ रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

वाचा: महिनाभराच्या व्हॅलिडीटीसह येणारे Reliance Jio , Airtel, Vi चे टॉप प्लान्स एकदा पाहाचSource link

Leave a Reply

Your email address will not be published.