मुंबई : आयर्लंडच्या दौऱ्यासाठी आता भारताचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघाला यावेळी एक नवा कर्णधार मिळाल्याचे या संघावर नजर फिरवल्यावर पाहायला मिळत आहे. भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यावर दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यातील पहिला सामना हा २६ जून आणि दुसरा सामना हा २८ जूनला खेळवण्यात येणार आहे.

भारताला या दौऱ्यासाठी नवीन कर्णधार मिळाला आहे. कारण या दौऱ्यासाठी भारताचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे देण्यात आले आहे. भारताचे महत्वाचे खेळाडू यावेळी इंग्लंडच्या दौऱ्यात व्यस्त असतील. त्यामुळे हा नवीन संघ बीसीसीआयने निवडला आहे. या संघाचे उपकर्णधारपद यावेळी भुवनेश्वर कुमारला देण्यात आले आहे.
भारतीय संघाची सलामीवीराची जबाबदारी आता इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर कायम ठेवण्यात आली आहे. कारण या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत इशान हा भन्नाट फॉर्मात आहे. इशानने आतापर्यंतच्या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये १६४ धावा केल्या आहेत. या दोघांनी भारताला चांगली सलामी दिली आहे. त्यामुळे या दोघांवर सलामीची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. भारतीय संघात यावेळी संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर आयपीएल गाजवणाऱ्या राहुल त्रिपाठीला यावेळी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. या संघात संजू सॅमसन असला तरी यष्टीरक्षणाची जबाबदारी मात्र दिनेश कार्तिककडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर भारतीय संघात दीपक हुडा आणि वेंकटेश अय्यर हे दोन अष्टपैलू खेळाडू असतील. भारताच्या वेगवान गोलंदाजीची मदार आता हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्यावर असेल. त्याचबरोबर या संघात तीन फिरकी गोलंदाज असतील. यामध्ये युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.