दोहा : ब्राझीलसारख्या दिग्गज संघाला FIFA world cup 2022 मधील पहिल्या सामन्यानंतर आता मोठा धक्का बसला आहे. कारण आता पुढच्या सामन्यासाठी ब्राझीलचा स्टार खेळाडू नेयमार खेळणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे.

नेमारवर विश्वचषक सुरु होण्यापूर्वीच क्रीडा विश्वाच्या नजरा होत्या. मेस्सी आणि रोनाल्डो यांनी आपल्या पहिल्या सामन्यात दमदार गोल केले आणि आपले खाते उघडले. पण नेयमारला मात्र आपल्या पहिल्या सामन्यात गोल करता आला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात नेमार कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता नेमारच्या चाहत्यांसाठी एक वाइट बातमी आली आहे.

पहिला सामना खेळत असताना नेयमारच्या घोट्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याचे आता समोर आले आहे. नेयमार त्यामुळे साखळी फेरीतील दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही, अशी माहिती समोर येत होती. पण नेयमार या पुढचा दुसरा सामना खेळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कारण ब्राझीलच्या संघाच्या डॉक्टरांनी, नेमार आपल्या घोट्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे आणि तो दुसरा सामना खेळू शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

पहिल्या सामन्यात नेयमारच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली होती. नेयमारच्या उजव्या घोट्याच्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की नेयमारच्या अस्थिबंधनाला दुखापत झाली आहे आणि सोमवारी स्वित्झर्लंडविरुद्ध खेळण्यासाठी तो फिट होणार नाही. नेयमार ब्राझीलचा दुसरा विश्वचषक सामना खेळणार नाही पण घोट्याच्या दुखापतीवर उपचार घेत असलेल्या संघात तो राहील, असे संघाच्या डॉक्टरांनी शुक्रवारी सांगितले.

नेयमारच्या दुखापतीवर आता ब्राझीलच्या संघाचे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्या नियमित चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांनंतर नेयमार कधी फिट होईल, हे सांगता येऊ शकते. पण सध्याच्या घडीला तरी नेमार हा विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नेयमार कधी फिट होणार आणि मैदानात कधी उतरणार, याची उत्सुकता सर्वांना असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *