नवी दिल्ली : भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण भारतीय कुस्तीपटूंचा अखेर विजय झाला आहे. जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघावर घातलेले निलंबन अखेर उठवले आहे. पण हे निलंबन उठवताना जागतिक कुस्ती महासंघाच्या प्रशासकीय समितीने सांगितले आहे की, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक या विरोधक त्रिकूटावर कोणतीही भेदभाव करणारी कारवाई होणार नाही भारतीय कुस्ती महासंघ करणार नाही. याबाबत भारतीय कुस्ती महासंघाने जर लेखी हमी दिली तरच त्यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारतीय खेळाडू तिरंग्याखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळू शकतात.

” भारतीय कुस्ती महासंघाने वेळेत निवडणूका न घेतल्यामुळे त्यांच्यावर निलंबन घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जातगिक कुस्ती संघटनेने अखेर ९ फेब्रुवारीला या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि त्यासाठी एक बैठक घेतली आणि सर्व घटक आणि माहिती लक्षात घेऊन निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला,” जागतिक संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.

लैंगिक छळ आणि भ्रष्टाचाराच्या कथित कृत्यांसाठी तत्कालीन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी आवाज उठवला होता. निषेधाच्या काही दिवसानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. पुनिया, मलिक आणि फोगट हे त्रिकूट निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि त्यांना भारतामधील कुस्तीपटूंची साथ मिळाली होती. त्यामुळे काही दिवसांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांचे निलंबन करण्यात आले आणि भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला होता. हा सर्व प्रकार जागतिक कुस्ती संघटना पाहत होती आणि त्यांनी आपला निर्णय जाहीर करत भारतीय कुस्ती संघटनेवर बंदी घातली होती.

साक्षी मलिकने मेडल पॅक केले, कष्टाचं सोनं गंगेत विसर्जीत होणार ?

भारतासाठी हा निर्णय सर्वात महत्वाचा मानला जात आहे. कारण या निर्णयामध्ये खेळाडूंसाठी चांगली गोष्ट करण्यात आली आहे. हा निर्णय देताना जागतिक संघटनेने भारतीय महासंघाला चांगलेच सुनावले असून खेळाडूंवर कोणतीही गैर कारवाई करू नये, असे त्यांनी थेट बजावले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *