अनेकदा गर्भवती महिलेला बाळाच्या जन्माअगोदरच दूध पाजण्याकरता आपल्या निप्पलला काही पद्धतीने तयार करणं गरजेचं असतं. यामुळे बाळाला दूध ओढताना अधिक त्रास होत नाही. निप्पल बाळाच्या सरळ तोंडात जाऊ शकते आणि त्याला दूध ओढणे सहज शक्य होऊ शकते. कारण दूध पाजणं हा जसा तुमचा पहिला अनुभव आहे तसाच तो बाळाचा देखील आहे.

प्रसूतीपूर्वीच निप्पलची योग्य काळजी घेतल्यास तुम्हाला निप्पल पेन किंवा निप्पल क्रॅकची समस्या सुरूवातीलाच जाणवणार नाही. कारण सुरूवातीचा अनुभव हा दोघांसाठी नवा असतो. अशावेळी कोणताही त्रास न होता तुम्ही बाळाला योग्य पद्धतीने फिडिंग करू शकलात तर हा अनुभव तुमच्यासाठी नक्कीच खास असू शकतो. मात्र अनेकदा प्रसूती झाल्यानंतर मातेला आपल्या निप्पलची ओळख होते. निप्पल फ्लॅट अथवा आतल्या बाजूस असल्यामुळे दूध पाजताना त्रास होऊ शकतो. अशावेळी खालील ५ गोष्टी करा आणि मातृत्वाचा हा खास अनुभव प्रेमाने घ्या. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​तुमचे निप्पल चेक करून घ्या

गर्भवती महिलांनी सर्वात प्रथम तुमचे निप्पल चेक करून घ्या. जर तुमचे निप्पल हे आतल्या बाजूला असतील किंवा फ्लॅट असतील तर तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगला त्रास होऊ शकतो. अनेकदा आतल्या बाजूला असलेल्या निप्पलचा आणि फ्लॅट निप्पलमुळे नवजात बालकांना दूध ओढण्यास त्रास होतो. कारण निप्पलचा काळा भाग त्यांच्या तोंडात व्यवस्थित जाऊ शकत नाही. हे निप्पल त्वचेजवळ असल्यासमुळे मुलांना दुध पिताना त्रास होतो पण असे निप्पल असलेल्या माता मुलांना फिडिंग करू शकतात.

(वाचा – Twins Surprising Facts : तुम्हाला देखील जुळी व्हावीत असं वाटतं? तर मग जुळ्या प्रेग्नेसीबद्दल जाणून घ्या ‘या’ सरप्राईजिंग गोष्टी))

​दूध पाजण्यापूर्वी छाती आणि निप्पलला मसाज करा

बाळाला दूध पाजण्यापूर्वी मातेने छातीला वरच्या माजूला थोडं मसाज करावं. यामुळे तुमचं दूध सुटण्यास मदत होते. तसेच निप्पलला देखील मसाज करावं. किंवा हाताने गोलाकार पद्धतीने फिरवावं जेणे करून बाळाच्या तोंडात काळ्या रंगाचा भाग सहज जाऊ शकतो आणि त्याला दूध ओढण्यास त्रोस होणार नाही. कारण असा त्रास झाल्यास बाळाची भूक भागत नाही. बाळाचं पोट भरण्यास त्रास होतो किंवा अनेक बाळ दूध ओढतानाच इतके दमतात की दूध न पिताच झोपून जातात.

(वाचा – गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या ‘मॉर्निंग रूटीनचे’ फॅन आहेत भारतीय पालक, सक्सेस मंत्रामुळे मुलं होणार कायम यशस्वीच..!))

​मसाज करताना तेलाचा वापर करा

अनेकदा निप्पलला मसाज करताना ठराविक क्रिमचा वापर केला जातो. मात्र क्रिम वापरल्यामुळे तुमच्या निप्पलला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, यामुळे बाळ दूध घेण्यास नकार देतं. यापेक्षा तुम्ही खोबरेल तेलाने निप्पलला मसाज केल्यास त्याचा फायदा होईल. मसाज केल्यानंतर तो संपूर्ण भाग स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. याचा बाळाला कोणताही त्रास होणार नाही.

(वाचा – When baby recognize fathers : कितव्या आठवड्यात तुमचं बाळ तुम्हाला ओळखायला लागतं, एक्सपर्टकडून जाणून घ्या प्रोसेस))

​निप्पल स्वच्छ करा

प्रत्येकवेळी ब्रेस्ट फिडिंग झाल्यानंतर निप्पल स्वच्छ पुसून ठेवण्याची सवय लावा. जेणे करून निप्पलला तुमच्या दुधाचा वास येणार नाही. अनेकदा बाळांना या वासाचा देखील त्रास होतो. त्यामुळे तुमच्याजवळ एक मऊसर कपडा ठेवा. जेणे करून फिडिंग झाल्यानंतर निप्पल स्वच्छ पुसून ठेवता येतील.

(वाचा – Nipple Discharge Without Pregnant : गर्भवती नसतानाही निप्पलमध्ये स्त्राव येतोय? हे वंधत्वाचं तर लक्षण नाही ना, जाणून घ्या))

​आंघोळ करताना निप्पलची विशेष काळजी घ्या

आंघोळ करताना मातांनी निप्पल स्वच्छ धुणे हे त्यांच्या आणि बाळाच्या दृष्टीकोनातून चांगली सवय आहे. यामुळे तुमचे निप्पल आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते. तसेच निप्पलला साबण लावताना काळजी घ्या. तेथे साबण राहणार नाही याची विशेष काळजी घ्या. कारण निप्पल बाळाच्या थेट तोंडात जातं. यामुळे साबण राहिल्यास बाळाला त्याचा त्रास होऊ शकतं.

(वाचा – Dengue Scare : गरोदर महिलांना डेंग्यूची लागण झाल्यास काय कराल? लक्षणे, उपाय आणि संपूर्ण गाइड लाइन)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.