संपत्तीच्या वादातून भाऊ अन् वहिनीने मृतदेहाचे तुकडे करुन नदीत फेकले…:पुण्यात नदीपात्रात करून खून झालेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा
पुण्यातील खराडी परिसरातील नदीपात्रात तीन दिवसांपूर्वी एका महिलेचा हात पाय आणि डोके अवस्थेत मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून या महिलेचा सख्खा भाऊ आणि वहिनीनेच खून केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी शीर धडा वेगळे केले. हात पाय मृतदेह नदी पात्रात फेकून दिला. सकीना खान असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी अशपाक खान आणि त्याची पत्नी हमिदा यांना ताब्यात घेतले आहे. नदीपात्रात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चंदन नगर पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. खून झालेल्या महिलेची ओळख पटली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी शहरातून बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेण्यात सुरुवात केली. पुणे शाखा आणि चंदन नगर पोलिस ठाण्यातील तपास पथक खून प्रकरणाचा तपास करत होते. खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. अवयव शोधण्यासाठी पोलिसांनी ड्रोन कॅमेरचा वापर केला होता. पोलिसांच्या पोलिसांच्या पथकाने येरवडा, खराडी, चंदन नगर, वडगाव शेरी भागात तपास केला. सकीना खान हिचा संपत्तीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने खून केल्याची माहिती तपासात मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहे.