देशातील २४,६८० नव्या गावांना मिळेल BSNL 4G सर्विस, शेकडो टॉवर उभारणार

नवी दिल्लीः
BSNL 4G Services संबंधीत अनेक मोठे निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतले आहेत. त्यासाठी बीएसएनएलचे अच्छे दिन येणार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने बीएसएनएल कंपनीला १.६४ लाख कोटी रुपयाच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. कंपनी आपल्या नेटवर्क आणि सर्विसला सुधारण्यासाठी या पैशाचा वापर करणार आहे. नवीन प्लानिंग अंतर्गत आता २४ हजार ६८० गावात BSNL 4G Services सुरू केली जाणार आहे. त्यासाठी देशात १९ हजार ७२२ मोबाइल टॉवर लावले जाणार आहेत. केंद्र सरकार ने Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) आणि Bharat Broadband Network (BBNL) च्या विलिनिकरणास सुद्धा मंजुरी दिली आहे.

BSNL 4G Services

5G in India लवकरच मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या 5G Services ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल अजून संपूर्ण देशात आपले 4G Network सुद्धा चालू करू शकले नाहीत. बीएसएनएलला अपग्रेड करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेटने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. याअंतर्गत BSNL ला आर्थिक मदत दिली जाणार आहे. कंपनी देशात नवीन मोबाइल टॉवर लावून अनेक ठिकाणी आपली 4G Services सुरू करणार आहे.

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, कॅबिनेटच्या निर्णयानंतर आता देशात २४ हजार ६८० गावात BSNL 4G Services दिली जाणार आहे. या क्षेत्रात ४जी सर्विस देण्यासाठी कंपनीला २६ हजार ३१६ कोटी रुपये पॅकेजला मंजुरी दिली आहे. फक्त इतकेच नाही तर ६,२७९ अशा गावाची निवड केली आहे. ज्या ठिकाणी सध्या 2G आणि 3G सर्विस उपलब्ध आहे. या गावांना अपग्रेड करताना ४जी नेटवर्क चालू केले जाणार आहे. बीएसएनएल देशात १९ हजार ७२२ मोबाइल टॉवर सुद्धा लावणार आहे.

१.५० लाख कोटींचा फंड
संपूर्ण भारतात BSNL 4G Services देण्यासाठी केंद्र सरकारने कंपनीला तगडे पॅकेज दिले आहे. 4G सर्विससाठी नवीन टेक्नोलॉजी व अपग्रेडसाठी बीएसएनएलला २६ हजार कोटीची मोठी रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय, ग्रामीण भागात वायरलाइन सर्विस देण्यासाठी बीएसएनएलला १३ हजार ७८९ कोटी रुपये इक्विटी उपलब्ध केला जाणार आहे. केंद्राकडून मिळालेल्या या मदतीने बीएसएनएलचा इक्विटी आधार ४० हजार कोटीवरून वाढून १.५० लाख कोटी होईल.

वाचाः गाणी ऐकताना मिळेल दुप्पट आनंद, अवघ्या ६०० रुपये सुरुवाती किंमतीत घरी आणा ‘हे’ शानदार हेडफोन्स

वाचाः स्वस्तात मिळत आहेत Apple चे सर्व प्रोडक्ट, iPhone आणि Apple Watch वर मोठा डिस्काउंटSource link

Leave a Reply

Your email address will not be published.