Authored by सचिन जिरे | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 18, 2022, 4:12 PM

Aurangabad news : करमाड येथून ८ प्रवासी घेऊन औरंगाबादकडे निघालेल्या मनपा बसने अचानक पेट घेतला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

 

Burning bus
Burning Bus: चालत्या बसला अचानक आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, पाहा VIDEO

हायलाइट्स:

  • औरंगाबादेत मनपाच्या बसने घेतला पेट
  • चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
  • औरंगाबाद-जालना महामार्गांवरील घटना
औरंगाबाद : करमाड येथून ८ प्रवासी घेऊन औरंगाबादकडे निघालेल्या मनपा बसने अचानक पेट घेतला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवलं आणि सर्व प्रवाशी सुखरूप असून कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना आज दुपारी औरंगाबाद-जालना महामार्गांवरील करमाड जवळ घडली.

प्रत्यक्षदर्शी आणी चालकाने दिलेल्या माहितीनुसार, चालक नारायण थोटे यांनी सकाळी (एम.एच.२० इ.इल.१३६३) या क्रमांकाच्या बसमध्ये औरंगाबाद येथून प्रवासी घेऊन करमाड येथे घेऊन जात होते. तेथे प्रवासी सोडल्यानंतर पुन्हा औरंगाबादकडे येण्यासाठी बसमधे ८ प्रवासी बसले होते. त्यांना घेऊन औरंगाबादकडे येत असताना औरंगाबाद-जालना रस्त्यावरील करमाड जवळ बसमधून अचानक धूर निघण्यास सुरुवात झाली. हा प्रकार चालक थोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी बस रस्त्याच्या कडेला थांबवत सर्व प्रवाशांना खाली उतरवून सुरक्षितस्थळी उभे केले.

Supriya Sule : भाजपने सरनाईक कुटुंबाची जाहीर माफी मागावी, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
थोटे यांनी बस मधील अग्निरोधकाने आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या एका बंबाच्या सहाय्याने जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण बस जळून राख झाली होती. बसमध्ये अचानक आग का लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये.

गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करा, सीएसएमटी येथे शिवप्रेमींचं आंदोलन

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.