पालघर: गेल्या डिसेंबर महिन्यापासून एका सोनसाखळी चोराने वसई परिसरात थैमान घातलं होतं. अखेर त्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पालघरच्या तलासरी येथील हा चोरटा बेरोजगार आहे आणि आपल्या होणाऱ्या बायकोला सोन्याचे दागिने भेट देण्यासाठी त्याने हे गुन्हे केल्याचं समोर आलं आहे. अमित शनवर (वय २८) असं या चोरट्याचं नाव आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याला त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी लवकरात लवकर सोन्याचे दागिने घ्यायचे होते. त्यामुळे त्याने बाईकवरुन जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा निर्णय घेतला. विरार (पश्चिम) येथे २५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता स्पोर्ट्स बाईकवर आलेल्या एका सोनसोखळी चोराने २८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढली आणि चोरुन नेली. या महिलेने या प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. दुचाकी चालवणाऱ्या महिलांची सोनसाखळी चोरणाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्यामुळे त्यांनी अर्नाळा, विरार आणि नालासोपारा येथे दाखल झालेल्या तक्रारींची पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर विरारच्या क्राईम युनिट ३ चे विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्हीवरुन मिळालेले फोटो आणि पीडितांनी दिलेले तपशीलवार वर्णनावरुन संशयित अमित शनवरची ओळख पटली. अमित शनवरने अर्नाळा येथे पहिले लक्ष्य निवडले आणि सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास त्याने एका ४२ वर्षीय महिलेच्या गळातील ६० हजार रुपये किंमतीची सोनसाखळी पळवली. त्यानंतर त्याने १३ जानेवारीपर्यंत कुठलीही चोरी केली नाही. मग त्याने दुसऱ्यांदा ३८ वर्षीय पार्लर मालक महिलेची सोनसाखळी चोरली. ही घटना देखील अर्नाळ्यात घडली. अत्यंत चलाखीने सोनसाखळी चोरुन पळून जाण्यात यशस्वी होत असल्याने त्याची हिंमत वाढली आणि त्याने २५ जानेवारीला पुन्हा एका महिलेची सोनसाखळी चोरली. यासर्व गुन्ह्यांमध्ये शनवरने आपली काळी स्पोर्ट्स बाईक, काळे हेल्मेट आणि जॅकेट वापरले होते. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी अखेर तलासरीच्या घरातून त्याला अटक केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *