लाहोर: पाकिस्तान क्रिकेट संघाची वर्ल्डकप २०२३ मधील कामगिरी लाजिरवाणी झाली. अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडकडून त्यांचा पराभव झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांची संपूर्ण स्पर्धेत बेदम धुलाई करण्यात आली. त्या बरोबर फलंदाज देखील फार दर्जेदार कामगिरी करू शकले नाहीत. अशात पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम आणि कोच मिकी आर्थर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकने कर्णधार आणि कोच यांच्यावर आरोप केलेत. वर्ल्डकपच्या आधी फिरकी गोलंदाजाच्या रणनितीवर आपण दिलेला सल्ला क्रिकेट समितीच्या बैठकीत दुर्लक्षित करण्यात आल्याचे मिस्बाहने म्हटले आहे. एका चॅनलवर बोलताना मिस्बाहने शाबाद खान आणि मोहम्मद नवाज यांच्या खराब कामगिरीवर आपण आधीच शंका व्यक्त केली होती. आशिया कप २०२३ मध्ये याबाबत संघाला अलर्ट केले होते. पण मी दिल्लेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि चेष्टा करण्यात आली.

भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार; अखेरच्या साखळी सामन्यात कर्णधार रोहितने प्लेइंग इलेव्हनबाबत दिला धक्का
मिस्बाहने पाकिस्तान संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ते संघाचे मुख्य कोच आणि मुख्य निवड समिती प्रमुख देखील होते. वर्ल्डकपमधील खराब कामगिरीवर बोलताने ते म्हणाले, फिरकीपटू हा महत्त्वाचा मुद्दा होता. संघातील फिरकी गोलंदाज खराब फॉर्ममध्ये होते. यावर उपाय शोधण्याची गरज होती. आशिया कपमध्ये शादाब आणि नवाज यांची कामगिरी चांगली झाली नव्हती. जेव्हा तुम्ही वर्ल्डकपमध्ये जाता त्याआधी गोष्टी तुमच्या हातात होत्या. संघात एक अतिरिक्त फिरकीपटू हवा होता.

टाइम आउट वादावर इतके स्पष्ट फक्त राहुल द्रविडच बोलू शकतात; मॅथ्यूज की शाकीब पाहा कोणाची बाजू घेतली
भारतात खेळताना तुम्हाला फिरकी गोलंदाजाची भूमिका महत्त्वाची आहे हे माहित असले पाहिजे होते. त्यामुळेच मिस्बाहने पाकिस्तान संघाला सल्ला दिला होता. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने ९ पैकी फक्त ४ लढती जिंकल्या. गुणतक्त्यात ते पाचव्या स्थानावर राहिले. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव झाला. वर्ल्डकपमधील ९ सामन्यात पाकिस्तानचा जलद गोलंदाज हारिस रौफने ५३३ धावा दिल्या. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाने इतक्या धावा दिल्या नाहीत.

Read Latest Sports News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *