शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण:शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोरील पोलिस बंदोबस्तात वाढ
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिस सध्या शिल्पकार जयदीप आपटे यांचा शोध घेत आहेत. दरम्यान आपटे यांच्या विरोधात काही संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी जयदीप आपटे यांच्या घरासमोरील पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे. या प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी स्ट्रक्चरल कन्सल्टंट आणि कंत्राटदार चेतन पाटील याला आधीच अटक केली आहे. चेतनला आज सिंधुदुर्गात आणण्यात येणार आहे. चेतन पाटील याला गुरुवारी रात्री कोल्हापुरातील त्याच्या नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली होती. चेतनने यापूर्वी दावा केला होता की तो प्रकल्पाचा स्ट्रक्चरल सल्लागार नव्हता. या प्रकरणात महाराष्ट्र कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही फक्त 6 फुटांसाठी परवानगी दिली होती. नौदलाने माहिती न देता त्याची उंची 35 फूट वाढवली. 26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंच पुतळा कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होता. यामध्ये ठाण्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे पोलिस आपटे यांचा शोध घेत आहेत. कला संचालनालयाचे संचालक म्हणाले- क्ले मॉडेल दाखवून परवानगी घेतली महाराष्ट्र कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, त्यांनी केवळ 6 फुटाचा पुतळा बसवण्याची परवानगी दिली होती. यासाठी शिल्पकाराने मातीचे मॉडेल दाखवले होते. मंजुरी मिळाल्यानंतर हा पुतळा 35 फूट उंच असेल, असे नौदलाने संचालनालयाला सांगितले नाही. तसेच त्यामध्ये स्टील प्लेट्स वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले नाही. राज्य PWD ने नौदलाकडे 2.44 कोटी रुपये हस्तांतरित केले होते. नौदलाने शिल्पकार आणि सल्लागारांची नियुक्ती केली आणि डिझाईन अंतिम झाल्यावर ते मंजुरीसाठी संचालनालयाकडे पाठवले गेले. नंतर उंची वाढली असावी. केवळ क्ले मॉडेलच्या आधारे नव्हे तर पुतळा बसवल्यानंतर कलाकार आणि शिल्पकारांना संचालनालयाकडून अंतिम मंजुरी घेण्यास सांगावे, असेही मिश्रा यांनी म्हटले. मंजुरीसाठी ही अट असावी, असेही ते म्हणाले. कोण आहेत चेतन पाटील?
शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा चेतन पाटील हे स्ट्रक्चरल कन्सल्टंट होते. 2010 पासून ते कोल्हापुरातील एका शैक्षणिक संस्थेत प्राध्यापक होते. दोन दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चेतन म्हणाले होते की, ‘पुतळ्याच्या उभारणीशी माझा काहीही संबंध नाही. मी केवळ पुतळ्यासाठी व्यासपीठ तयार केले. पुतळ्याचे काम पुण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते. अजित पवार म्हणाले- स्मारक पुन्हा बांधू
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी सकाळी मालवणच्या सिंधुदुर्गात पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी ते म्हणाले, की ‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून त्यांच्या इतिहासाचा सर्वांना अभिमान आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या आहेत. स्मारकाची पुनर्बांधणी केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. ते कुठेही पळाले तरी सापडतील. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते- 2 समित्या चौकशी करतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकार युद्धपातळीवर निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. या घटनेच्या चौकशीसाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यासाठी नौदल अधिकारी, आयआयटीयन, आर्किटेक्ट, इंजिनीअर आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार यांना पाचारण करण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणात राजकारण करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांना मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही शिंदे यांनी म्हटले होते. पीएम मोदींनी डिसेंबर 2023 मध्ये केले होते अनावरण गेल्या वर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि मराठा नौदलाचे आधुनिक भारतीय नौदलाशी असलेले ऐतिहासिक नाते यांचा सन्मान करणे हा हा पुतळा बसवण्याचा उद्देश होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.