छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र:महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी
महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाराणी ताराबाई यांच्या स्मृतीस्थळाबद्दल अधिक व विस्तृत संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी या पत्राद्वारे छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. इतिहास अभ्यासकांनी महाराणी ताराबाई यांचे स्मृतीस्थळ हे सातारा येथे संगम माहुली येथे असल्याचे मांडले आहे. महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून...