मोदी भान सुटल्याप्रमाणे बोलतात:भक्त टाळ्या वाजवून फेकुगिरीस प्रोत्साहन देतात; उद्धव ठाकरे गटाचा थेट पंतप्रधानांवर हल्ला
370 कलमाचा विषय महाराष्ट्राच्या व झारखंडच्या निवडणुकीत आणायचे कारण नाही. तरीही मोदी महाराष्ट्रात 370 कलमाचा बुलबुलतरंग वाजवीत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तो मोदींच्या धोरणांमुळे. महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवून मोदी यांनी मराठी तरुणांच्या पोटावर लाथ मारली. 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा आमचे उद्योग गुजरातला का पळवले? आमच्या पोरांना बेरोजगार का ठेवले? या प्रश्नांची...