सीइओंनी घेतली महिला कर्मचाऱ्यांची संवाद कार्यशाळा:अधिकारी-कर्मचारी दरी कमी करण्याचा प्रयत्न
अधिकारी, कर्मचारी यांच्यातील दरी घटविण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा परिषदेच्या सीइओ संजीता महापात्र यांनी महिला कर्मचाऱ्यांची संवाद कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेतील मार्गदर्शनानंतर उपस्थित महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यादरम्यानचे संबंध सहज, सुलभ आणि एक-दुसऱ्याला पुरक असावे, असे मत यावेळी महापात्र यांनी व्यक्त केले. त्यासाठी नावीण्यपूर्ण कल्पनेचा भाग म्हणून त्यांनी ही एक दिवसीय संवाद कार्यशाळा आयोजित केली होती. त्यांच्यामते महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच समस्या असतात. परंतु त्याकडे हवे तेवढे लक्ष देण्यास त्यांना व त्यांच्या विभागप्रमुखांना वेळ नसतो. हीच बाब हेरून हा नवा उपक्रम वेळोवेळी राबविला जाणार आहे. यावेळी आरोग्य विभागातील पथक आणि स्त्री रोग तज्ञांकडून महिलांची आरोग्य तपासणी, मुख रोग तपासणी, रक्त चाचणी करण्यात आली. याशिवाय मानसीक रोग सल्ला, घरकाम आणि कार्यालयीन कामाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनही करण्यात आले. दरम्यान महिलांविषयक कायदे, विशाखा समिती तसेच इतर बाबींची माहिती विधी अधिकारी ॲड. प्रणाली कठारे व ॲड. प्रणिता भाकरे यांनी दिली. कार्यशाळेच्या शेवटी जि. प. आवारात ‘ ऐक पेड माँ के नाम ‘ कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता डॉ. अभिजीत वानखडे, डॉ. साजीत पटेल, अशोक काठोरी , अर्पणा आत्राम, अर्चना लाहुडकर, गायत्री लाचुरे, अर्चना मानकर, बबिता राणे, दीपाली पडोळे यांनी परिश्रम घेतले. टॉक टू सीइओ कार्यशाळेदरम्यान टॉक टू सीइओ अशी चर्चाही करण्यात आली. या कार्यक्रमात संजीता महापात्र यांनी आपल्या वैयक्तिक आणि कौटूंबिक जीवनाचा प्रवास, पूर्वीच्या नोकरीतील आलेला अनुभव, युपीएससी परीक्षेसाठी कुंटूबातून मिळालेले पाठबळ इत्यादी बाबतचे अनुभव सांगितले. तसेच उपस्थित महिलांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, मुख्य लेखा वित्त अधिकारी अश्विनी मारणे यांनी महिलांनी सक्षम होण्यासाठी आपली भूमिका विषद केली.