रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात देवरुख-संगमेश्वर मार्गावर बुरंबी गेल्येवाडी स्टॉपजवळ इको कारच्या धडकेत रस्त्याजवळून जात असलेल्या एका ६० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात गेल्येवाडी येथील श्रीराम बारका भुरवणे (वय ६०) असे अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ही घडली आहे. आपले चहाचे दुकान बंद करून निघालेल्या भुरवणे यांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे.

श्रीराम भुरवणे हे गेली अनेक वर्षे देवरुख पंचायत समिती समोर चहाची टपरी चालवत होते. मूळचे शेतकरी असलेले ते वालाच्या शेंगांचे उत्पन्न घेऊन त्या शेंगा विक्रीसाठी देखील आणत असत. अत्यंत साधे आणि कष्टकरी व्यक्तीमत्व म्हणून ते सगळ्यांना परिचित होते. व्यवसायही करत ते सकाळी आपली टपरी उघडायचे आणि संध्याकाळी ७ नंतर सगळं आवरून परत घरी येत असे. नेहमीप्रमाणे ते काल बुधवारी बसमधून उतरल्यावर चालत घरी जात असताना मागून येणाऱ्या इको कारचालकाने जोराची धडक दिली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच देवरूख परिसरावर शोककळा पसरली.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी, जाणून घ्या मोठे बदल
श्रीराम भुरवणे हे हसतमुख आणि प्रामाणिक व्यक्तीमत्व होते. आपल्या चहाच्या व्यवसायावर ते कुटुंबाचा उदरिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी झाडाची फांदी पडून त्यांच्या टपरीचे मोठे नुकसान झाले होते त्या प्रसंगातून सावरत न डगमगता त्यांनी पुन्हा टपरी सुरू करत आपला व्यवसाय सुरू केला होता.

कारने दिलेली धडक एवढी भीषण होती की, त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर कारचालक पसार झाला. मात्र, स्थानिक तरुणांनी लगेच फोनाफोनी करुन त्याला पकडले. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उदय झावरे आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. कारतालक संशयित स्वप्नील सुहास ब्रीद (वय ३३ रा. तांबेडे) या संशयित चालकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनानुसार संगमेश्वर पोलीस करत आहेत.

आधी गावातील लाईट बंद केली, मग चौकात एकट्याला गाठलं; भावानेच १५ वर्षीय मुलाला संपवलंSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *