मुंबई : गौतम गंभीर हा सर्वांवरच टीका करत असतो, हे पाहण्यात आले आहे. पण गंभीरने यावेळी चक्क रोहित शर्माचे सेमी फायनलपूर्वी कौतुक केले आहे. भारतीय संघात रोहितने कोणती एकच गोष्ट करून बदल घडवला, याबाबत गंभीरने आपले मत मांडत असताना रोहितवर मात्र कौतुकाता वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहितच्या नेतृत्वाचे आणि फलंदाजीच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले होते. गंभीरनेही रोहितच्या नेतृत्वाला शाबासकी दिली. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी पाच वेळा आयपीएल जिंकली असून, चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेचे (स्पर्धा आता बंद) जेतेपदही पटकावले होते. याचे दाखलेही गंभीरने दिले. एका क्रीडा वाहिनीवरील विश्लेषणाच्या कार्यक्रमात गंभीरने आपली मते मांडली. वर्ल्ड कपमध्ये रोहितने फलंदाजी आणि कर्णधारपद दोन्ही भूमिका खूप छान निभावल्या आहेत. भारताने सलग नऊ लढती जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ‘एक चांगला कर्णधार कायमच आपल्या संघसहकाऱ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देतो. रोहितने नेमके तेच केले आहे. ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्येही खेळीमेळी असते. स्वतः कर्णधारासह इतर १४ खेळाडूंनाही संघात सुरक्षित वाटले पाहिजे. कुणाच्याही मनात अनिश्चितता किंवा संभ्रमाला जागा नसावी,’ असे गंभीर म्हणाला.

‘रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विक्रमी यश मिळवले आहे. कर्णधार म्हणून त्याच्या यशाची टक्केवारी बरेच काही सांगून जाते. कर्णधार म्हणून त्याच्या नावावर मोठे विजय, विक्रम आणि जेतेपदांची नोंदही आहे. संघनायक म्हणून ड्रेसिंगरूममध्ये खिलाडूवृत्तीचे वातावरण कायम ठेवण्यात रोहित कायम यशस्वी ठरला आहे. खेळाडू आपली मते न घाबरता, आपुलकीने मांडतात. व्यक्त होतात, असे स्वातंत्र्य रोहितने दिले आहे,’ असे गंभीर म्हणाला. भारताच्या या माजी सलामीवीराची री ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरन फिंचनेही ओढली. सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये आवश्यक असणारा आक्रमक पवित्रा रोहितमध्ये आहे, जे फिंचला भावते. ‘पॉवरप्लेमधील रोहितचा आक्रमक पवित्रा वाखाणण्याजोगा असतो. खेळपट्ट्या उत्तरार्धात संथ होतात याचे आकलन असल्याने रोहित सुरुवातीला अधिकाधिक धावा होतील, यासाठी आक्रमणच करतो. ज्यामुळे प्रतिस्पर्ध्यावरील दडपण वाढते,’ असे निरीक्षण फिंचने नोंदविले.

विराट कोहली अन् शुभमन गिलचा गंमतीदार व्हिडिओ

भारतीय संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहिला आहे आणि त्यानंतर रोहित शर्माचे टीकाकारही त्याला शाबासकी देत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *