[ad_1]

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलेला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. यासाठी पोलिसांनी छत्रपती चौक ते मानेवाडा चौक दरम्यानचे १०० सीसीटीव्ही फुटेज शोधून या महिला चोरट्यापर्यंत पोहोचले. या महिलेकडून तीन लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

मोठ्या विश्वासानं कामावर ठेवलं; मोलकरणीचे धक्कादायक कृत्य, मालक पोलीस दरबारी, नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला अशोक भुजबळे (वय ४९) रा. वाडी वार्डे असे फिर्यादीचे नाव आहे. भुजबळे हे नागपुरात राहणाऱ्या त्यांची वहिनी वनिता चरडे हिला सोन्याचा हार व पाच ग्रॅमची अंगठी देण्यासाठी नागपुरात आले आणि कोराडी येथे राहणाऱ्या स्वप्नील मांगे यांच्या घरी थांबले. दुसऱ्या दिवशी उर्मिला भुजाबळे आपल्या मुलीसह मेट्रोने छत्रपती चौकात आल्या आणि तेथून ऑटोने म्हाळगी नगरला गेले. त्याचवेळी सुमारे ४० ते ४५ वयोगटातील एक महिला त्यांचाजवळ येऊन बसली. उर्मिला भुजबळे यांनी दागिने पर्समध्ये ठेवले होते. ऑटोमध्ये महिलेची काळी पिशवी होती. महिला मानेवाडा चौकात उतरली. त्यानंतर उर्मिला भुजाबळे या म्हाळगी नगर चौकाजवळ आल्या असता त्यांनी पैसे काढण्यासाठी पर्स तपासली असता ती उघडी दिसली. आत ठेवलेली सोन्याची चेन आणि अंगठी दिसत नव्हती. आजूबाजूला शोध घेऊनही चेन आणि अंगठी दिसुन न आल्याने हुडकेश्वर पोलीसात तक्रार करण्यात आली.

श्रावण महिन्यात तरुणाने देवालाच केले टार्गेट; मंदिरात जायचा, पाया पडायचा, अन् अलगद…

हुडकेश्वर पोलीसांनी परिसरात झडती घेतली. शहरातील रस्त्यांवर आणि लोकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये सुमारे १०० सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. कॅमेरे तपासल्यानंतर चोर ही ऑटोमधील दुसरीच महिला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या महिलेला कन्हान येथून पकडले असून सविता शेंडे (विवेकानंद नगर, कन्हान) असे आरोपी महिलेचे नाव आहे. महिला अधिकाऱ्याने महीलेला विश्वासात घेऊन बारकाईने विचारपूस केली असता तीने ऑटोमधून दागिने चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीचे सोन्याचे चेन आणि सोन्याची अंगठी असा एकूण जवळपास तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या, गावकऱ्यांनी हलगी वाजवून गावात मिरवणूक काढली

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *