चंद्रपूर : आपल्या सात दिवसांचा मुलीला भर रस्त्यात टाकून पळ काढणाऱ्या बापाला गावकऱ्यांनी पकडले. गावकऱ्यांनी त्याला पकडून थेट ग्रामपंचायत कार्यालायात डांबले. घटनेनंतर मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे आज घडली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी मुलीच्या बापाला ताब्यात घेतले आहे.

शिरशी बेरेडी येथील कुमोद पौरकर या युवकाशी विठ्ठलवाडा येथिल भाग्यश्री शालीक देवतळे या तरुणीचा विवाह झाला होता. या दोघांना सात दिवसांपूर्वी मुलगी झाली. आपल्या मुलीला बघण्यासाठी कुमोद पौरकर हा आज विठ्ठलवाडा येथे आला होता. यावेळी पती-पत्नीत भांडण झालं. या भांडणामुळे कुमोद हा आपल्या सात दिवसांच्या मुलीला घेऊन निघाला. तर पत्नी भाग्यश्री मुलीला परत घेण्यासाठी त्याचा मागे मागे धावत होती. भाग्यश्री आणि तिच्यासोबत असलेल्यांनी आरडाओरड केली. तेव्हा भर रस्त्यात आपल्या सात दिवसांच्या मुलीला टाकून कुमोद पळू लागला.

ती झाडाखाली जेवायला बसली आणि मृत्यूनेच तिचा घास घेतला…

नागरिकांचा आरडाओरडा आणि कमोद पळून जात असल्याचे पाहून गावकऱ्यांनी त्याला पकडले. गावकऱ्यांनी त्याला विठ्ठलवाडा ग्रामपंचायत कार्यालयात आणले. घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांनी देण्यात आली. पोलीस घटनास्थळ दाखल झाले आणि त्यांनी कुमोद पौरकर याला ताब्यात घेतले. मुलीला रस्त्यात टाकल्याने तिला दुखापत झाली आहे. घटनेत मुलीची हालचाल बंद झाली होती. यामुळे मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विजेचं तांडव: पावसाळ्यात शेतात काम करणं ठरतंय जीवघेणं; चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून तिघांनी गमावला जीवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.