चंद्रपुरातील खासगी शाळेचे अदानींना हस्तांतरण; विरोधकांची टीकेची झोड:महाराष्ट्राचा 7/12 अदानींच्या नावे करणार का ? वडेट्टीवार यांचा सवाल

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटीची पहिली ते १२ वी सीबीएससी शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला अाहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली अाहे. आता महाराष्ट्राचा ७/१२ अदानींच्या नावे करणार का ? अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
एसीसी सिमेंट कंपनीतील अधिकारी-कामगारांच्या मुलांसाठी ही शाळा उभारण्यात अाली होती. दोन वर्षांपूर्वी अदानी उद्योग समूहाने एसीसी कंपनी विकत घेतल्यानंतर ही शाळा अहमदाबादच्या अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित होणार आहे. येत्या १५ दिवसांत शाळेचे व्यवस्थापन बदलण्यात यावे, अशा सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या शासन निर्णयातूनदेण्यात आल्या आहे.दोन वर्षांपूर्वी अदानी यांनी एसीसी सिमेंट कंपनी विकत घेतली होती. एसीसी कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून १ ते १२ वी पर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा उभारली होती. मात्र, कंपनी अदानी यांनी विकत घेतल्याने त्या शाळेचे व्यवस्थापन आता अदानी ग्रुप कडे गेले आहे. परिणामी अहमदाबाद येथील अदानी फाैऊंडेशनला या शाळेचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सुमारे २ हजार विद्यार्थ्यांची या शाळेत पटसंख्या असून शाळेतील शिक्षकांनी मात्र या आदेशानंतर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सर्वाधिक शिक्षकांचे मोबाईल बंद आहेत.
महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच अदानीचा धोका
महायुती सरकारएवढाच महाराष्ट्राला अदानीचादेखील धोका आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या, आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवले आहे का? – विजय वडेट्टीवार,विरोधी पक्षनेते ​​​​​​​अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ
देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. आता शाळादेखील हे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे. आता थेट चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार अदानी समूहाकडे दिला आहे. – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

​चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटीची पहिली ते १२ वी सीबीएससी शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला अाहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली अाहे. आता महाराष्ट्राचा ७/१२ अदानींच्या नावे करणार का ? अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
एसीसी सिमेंट कंपनीतील अधिकारी-कामगारांच्या मुलांसाठी ही शाळा उभारण्यात अाली होती. दोन वर्षांपूर्वी अदानी उद्योग समूहाने एसीसी कंपनी विकत घेतल्यानंतर ही शाळा अहमदाबादच्या अदानी फाउंडेशनकडे हस्तांतरित होणार आहे. येत्या १५ दिवसांत शाळेचे व्यवस्थापन बदलण्यात यावे, अशा सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या शासन निर्णयातूनदेण्यात आल्या आहे.दोन वर्षांपूर्वी अदानी यांनी एसीसी सिमेंट कंपनी विकत घेतली होती. एसीसी कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून १ ते १२ वी पर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा उभारली होती. मात्र, कंपनी अदानी यांनी विकत घेतल्याने त्या शाळेचे व्यवस्थापन आता अदानी ग्रुप कडे गेले आहे. परिणामी अहमदाबाद येथील अदानी फाैऊंडेशनला या शाळेचे हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सुमारे २ हजार विद्यार्थ्यांची या शाळेत पटसंख्या असून शाळेतील शिक्षकांनी मात्र या आदेशानंतर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. सर्वाधिक शिक्षकांचे मोबाईल बंद आहेत.
महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच अदानीचा धोका
महायुती सरकारएवढाच महाराष्ट्राला अदानीचादेखील धोका आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या, आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवले आहे का? – विजय वडेट्टीवार,विरोधी पक्षनेते ​​​​​​​अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ
देशाला शिक्षणाचा मार्ग देणाऱ्या महाराष्ट्रावर आज अदानी समूहाच्या हातून बाराखडी लिहिण्याची वेळ आली आहे. आता शाळादेखील हे सरकार अदानीच्या ताब्यात देत आहे. आता थेट चंद्रपूरच्या माउंट कार्मेल शाळेचा कारभार अदानी समूहाकडे दिला आहे. – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment