[ad_1]

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं (इस्रो) चांद्रयान-३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत गेलं आहे. सोप्या शब्दात याचा अर्थ चांद्रयान-३ आता चंद्राच्या थोडं जवळ पोहोचलं आहे. इस्रोने केलेल्या ट्विटनुसार, आजच्या यशस्वी ऑपरेशनमुळे भारताच्या चांद्रयान-३ ची कक्षा १७४ किमी x १४३७ किमी इतकी कमी झाली आहे.

इस्रोने ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.४० वाजता कक्षा बदलली. म्हणजे चांद्रयान-३ चे थ्रस्टर्स चालू झाले. ५ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी चंद्रावरून पहिलं छायाचित्रं पाठवलं होतं. अंतराळ संस्थेनं आपल्या ट्विटमध्ये असेही म्हटलं आहे की, या महत्त्वपूर्ण ऑपरेशनचा पुढील टप्पा १४ ऑगस्ट रोजी नियोजित करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यावर पाऊस रूसला, मुंबईसह या भागांत दिवसा उन्हाचा चटका
याआधीही इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ मंगळवारी म्हणाले होते की, ‘जर सर्व काही बिघडलं, सर्व सेन्सर निकामी झालं, काहीही काम झालं नाही, तरीही यान चंद्रावर उतरेल. हे अशा प्रकारे डिझाइन केले आहे.

भारताच्या या चंद्र मोहिमेवर जगातील अंतराळ संस्था बारीक लक्ष ठेवून आहेत. तिसऱ्या कक्षेत जाण्यापूर्वी, इस्रोच्या बॉसने चांद्रयान-3 च्या प्रवासाच्या अंतिम टप्प्याबद्दल विस्तृतपणे सांगितले. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेपासून शेवटचे १०० किमी अंतर चांद्रयान-3 च्या भवितव्यासाठी खूप महत्वाचे असेल. १०० किमीचा हा प्रवास हे मिशन यशस्वी होणार की नाही हे ठरवेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *