नवरात्रोत्सवात चांदवडच्या रेणुका देवीचे मंदिर रात्री एक वाजेपर्यंत राहणार खुले:पूर्वतयारीसाठी चांदवड तहसीलदारांच्या विभागप्रमुखांना सूचना
नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांना विविध सेवा सुविधा पुरवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे व उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले. भाविकांच्या सोयीसाठी १२ हजार क्वेअर फुटांचा वॉटरप्रुफ मंडप बांधण्यात आला असून र्दशनासाठी मंदिर रात्री एकपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. श्री रेणुका देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या ३ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या येथील पार्श्वभूमीवर उत्सवाची पूर्वतयारी व यात्रा कालावधीत करावयाच्या उपाययोजनांबाबत शासकीय विभागप्रमुखांसमवेत देवी मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी रेणुका देवी संस्थानचे सहायक व्यवस्थापक सुभाष पवार, पोलिस निरीक्षक कैलास वाघ, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता तुषार सूर्यवंशी, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवनाथ आव्हाड उपस्थित होते. बैठकीत वैद्यकीय पथक, सुरक्षा पथक कार्यान्वित करणे, रुग्णवाहिका, इमर्जन्सी कीट, गर्दीचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यात्रोत्सव काळात वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याची अपेक्षा रेणुका देवी संस्थानचे सहायक व्यवस्थापक सुभाष पवार यांनी व्यक्त केली. . यात्रोत्सवात वाहतूक कोंडी होऊन भाविकांची गैरसोय होणार नाही. यासाठी उपाययोजना करण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता तुषार सूर्यवंशी यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संदीप उगले यांनी भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनतर्फे सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरपरिषद प्रशासनाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने परिसराची स्वच्छता व मोबाइल टॉयलेटच्या उपाययोजनांबाबत नगरपालिका प्रशासनास पत्र देण्याची सूचना कुलकर्णी यांनी केली. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी आभार मानले. बैठकीस आरोग्य विभागाचे एन. एस. माठा, सहायक पोलिस निरीक्षक एस. एच. आखेगावकर, मंडळ अधिकारी गणेश शिरसाठ उपस्थित होते. पथक कार्यान्वित भाविकांच्या वाहन पार्किंगबाबत योग्य त्या सूचना करण्यात आल्या. यात्रोत्सव काळात दुचाकी घसरून अपघात, जीवितहानी होऊ नये, यासाठी महामार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी संबंधितांनी काळजी घ्यावी, अशी सूचना पांडुरंग भडांगे यांनी केली. यावेळी सोमा टोलनाक्याचे अपघात विभागप्रमुख प्रशांत ठाकरे यांनी यात्रोत्सवात टोलचे अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका, क्रेनसह टीम सज्ज राहणार असल्याचे सांगितले.