मीरा मुराती यांना अंतरिम जबाबदारी
ChatGPT सीईओ सॅम ऑल्टमन यांना हटवल्यानंतर मीरा मुराती यांच्याकडे कंपनीची जबाबदारी सोपवण्यात आली असून आता अंतरिम सीईओ म्हणून कंपनीचा ताबा घेतील. २०१८ मध्ये टेस्ला कंपनी सोडल्यानंतर मीरा OpenAI (चॅटजीपीटीची मूळ कंपनी) मध्ये रुजू झाली.
मीराच्या नियुक्तीच्या आधारावर प्रश्नांना उत्तर देताना ओपनएआयने एका निवेदनात म्हटले की, “मीराचा दीर्घ कार्यकाळ आणि AI गव्हर्नन्स व धोरणातील तिचा अनुभव तसेच कंपनीच्या सर्व पैलूंशी तिची संलग्नता लक्षात घेता, बोर्डाचा विश्वास आहे की ती या भूमिकेसाठी पात्र आहे.”
कोण आहे मीरा मुराती?
१९८८ मध्ये अल्बानिया येथे जन्मलेल्या मीराचे आई-वडील भारतीय वंशाचे असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला असून त्यांनी कॅनडामधून मेकॅनिकल इंजिनिअर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर टेस्ला येथे काम करताना त्यांनी मॉडेल एक्स टेस्ला कार तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर २०१८ मध्ये त्यांनी चॅटजीपीटीची मूळ कंपनी Open AI येथे रुजू झाली तर गेल्या वर्षी ओपनएआयची सीटीओ पदावर बढती मिळाली. मुराती २०१८ मध्ये ओपनएआयमध्ये रुजू झाल्या ज्यामध्ये सुपरकंप्युटिंग रणनीती आणि संशोधन कार्यसंघ व्यवस्थापित करण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली. मुराती नेतृत्व संघाचा देखील भाग होती आणि संघाने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीत मदत करायच्या.
टाईम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मीराने सांगितले होते की AI चा गैरवापर होऊ शकतो. त्यांनी म्हटले की, “मला विश्वास आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर होऊ शकतो आणि हे फक्त वाईट हेतू असलेले लोकच करतील. आम्ही एक लहान गट आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेला नियामक कक्षेत आणण्यासाठी सरकारसह सर्वांना एकत्र यावे लागेल.”
चॅटजीपीटी मागील डोके
३८ वर्षीय सॅम ऑल्टमन गेल्या वर्षी AI आधारित चॅटबॉट, चॅटजीपीटी जगासमोर आणताच प्रकाशझोतात आले. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटमध्ये माणसांप्रमाणे कविता किंवा कथा लिहिण्याची क्षमता असून चॅटजीपीटी अवघड प्रश्नांचीही सहज उत्तरे देते. हे खूप युजर फ्रेंडली देखील आहे, म्हणजेच ते वापरण्यास अतिशय सोपे आहे.
ChatGPT तयार करणाऱ्या OpenAI या कंपनीचा पाया २०१५ मध्ये घातला गेला. सॅम ऑल्टमन व्यतिरिक्त कंपनीच्या सह-संस्थापकांमध्ये ग्रेग ब्रॉकमन, मशीन लर्निंग तज्ञ इल्या सुत्स्केव्हर, जॉन शुल्मन, वोज्शिच झारेम्बा आणि टेस्ला मालक एलोन मस्क यांचा समावेश असून मस्क आता कंपनीच्या बोर्डाचा भाग नाही.