: कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एक हृदयद्रावक घटना घडली. बंद घरात झोपलेल्या कुटुंबाचा झाला आहे. कुटुंबात चौघांचा समावेश होता. श्वास गुदमरल्यानं त्यांचा अंत झाला. कुटुंबाच्या मृत्यूनं परिसरावर शोककळा पसरली आहे. बंगळुरूच्या ग्रामीण भागात ही घटना घडली. पोल्ट्री फार्ममधील एका खोलीत कुटुंब झोपलं होतं.घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. चारही मृतांची ओळख पटली आहे. काले सारिकी, लक्ष्मी सारिकी, उषा सारिकी आणि पूल सारिकी अशी त्यांची नावं आहेत. मृत पावलेलं कुटुंब मूळचं पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार जिल्ह्याचे रहिवासी आहेत. गेल्या १० दिवसांपासून ते डोड्डाबल्लापूर तालुक्यातील डोड्डाबेलावंगला जवळच्या होलेयाराहल्लीमधील पोल्ट्री फार्ममध्ये काम करत होते.पोलिसांच्या प्राथमिक तपासातून आलेल्या माहितीनुसार कुटुंबाचा मृत्यू श्वास गुदमरल्यानं झाला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. ‘घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक पोहोचलं. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. पोलिसांना दार तोडून आत प्रवेश केला. संपूर्ण घर धुरानं भरलं होतं. एक चारकोल हिटर, काही पानं आणि कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते. आम्ही फॉरेन्सिक पथकाला पाचारण केलं. त्यांनी घटनास्थळावरुन नमुने गोळा केले आहेत,’ अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली.व्हिक्टोरिया रुग्णालयात मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात आलं. यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ‘रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू होता. त्यामुळे डासांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी आणि घर उबदार ठेवण्यासाठी कुटुंबानं चारकोल हिटर आणि काही पानं पेटवली. घर आतून बंद होतं. त्यामुळे कोळशाचा धूर घरभर पसरला. त्यामुळे चौघांचा श्वास कोंडला,’ असं पोलिसांनी सांगितलं. त्यांनी घातपाताची शक्यता फेटाळून लावली. घरात कोणताही विषारी पदार्थ सापडलेला नाही. मृतदेहांवर जखमांच्या खुणा नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *