‎चौंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळ बैठक:इतिहासात पहिल्यांदाच असे आयोजन; बैठकीची प्रशासकीय तयारी पूर्ण

‎चौंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळ बैठक:इतिहासात पहिल्यांदाच असे आयोजन; बैठकीची प्रशासकीय तयारी पूर्ण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी‎वर्षानिमित्त अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या ‎चौंडी येथे आज मंत्रिमंडळाची बैठक‎ होत आहे. या बैठकीची प्रशासकीय तयारी सोमवारी ‎रात्रीच पूर्ण झाली आहे. चौंडीसारख्या ग्रामीण भागात‎ प्रथमच महायुतीचे मंत्रिमंडळ दाखल होणार आहेत. ‎बहुतांशी मंत्री अहिल्या नगर येथील शासकीय ‎विश्रामगृहावर मुक्कामी आले. दरम्यान, मुख्यमंत्री, ‎उपमुख्यमंत्र्यांसाठी चौंडीत विश्रांती कक्ष, दोन ‎किमीवर वाहन पार्किंग व्यवस्था केली आहे.‎ या बैठकीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. दुपारी ‎12.30 वाजता बैठकीला सुरुवात होईल. दोन तास‎ बैठक चालणार आहे. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ‎उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने चौंडीत ‎आगमन होईल. बैठकीसाठी साडेतीन हजार खुर्च्यांची ‎व्यवस्था केली आहे. दरम्यान, चौंडी पासून दोन किमी‎ अंतरावर सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागामार्फत‎ 80.90 कोटी रुपयांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी ‎होळकर सहकारी सुत गिरणीचे भूमिपूजन मुख्यमंत्री ‎देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.‎ मंडपात उभा केला‎ अहिल्यादेवींचा काळ‎ बैठकीच्या नियोजनाची विधान परिषदेचे ‎सभापती प्रा.राम शिंदे यांनी पाहणी केली. ‎बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंडपामध्ये फोटोंच्या माध्यमातून अहिल्यादेवींचा ‎काळ उभा केला गेला आहे. यात ‎अहिलेश्वर मंदिर, जुनी गढी, कौलारु ‎घरे, बैलगाडीचे मोठो फोटो लावले आहेत. मंडपाच्या बाजूला मंत्री व ‎व्हीआयपींच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. संपूर्ण हॉल वातानुकूलित करण्यात ‎आला आहे. अग्निशमन च्या सात वाहने ‎येथे असतील. पडळकर यांच्या फलकावर अजित पवार यांचे नाव नाही गावात ठिकठिकाणी ‎मुख्यमंत्रदी दोन्ही उपमुख्यमंत्री व इतर ‎मंत्र्यांच्या स्वागताचे मोठ मोठे फलक‎लावले आहेत. आमदार गोपीचंद‎ पडळकर यांच्या फलकावर मात्र ‎उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव व फोटो नसल्याने याची दिवसभर चर्चा ‎रंगली होती. हाळगावच्या कृषी महाविद्यालच्या सभागृहासाठी 14 कोटी‎ जामखेड तालुक्यातील हाळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सभागृहासाठी (कॉन्फरन्स हॉल) इमारत‎ उभारणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व‎ मत्स्यव्यवसाय विभागाकडून 14 कोटी 32 लाखांची प्रशासकीय मान्यता सोमवारी‎ देण्यात आलेली आहे.‎

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment