चेन्नई कसोटी- पहिल्या डावात भारत 376 धावांवर ऑलआऊट:झाकीरपाठोपाठ आकाश दीपने मोमिनुलला बोल्ड केले; बांगलादेश 26/3
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ 376 धावांत ऑलआऊट झाला आहे. शुक्रवारी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, टीम इंडियाने 339/6 धावसंख्येपासून खेळण्यास सुरुवात केली आणि 37 धावा करताना शेवटच्या 4 विकेट गमावल्या. यापैकी तस्कीन अहमदने ३ बळी घेतले. पहिल्या दिवशी शतक झळकावणाऱ्या रविचंद्रन अश्विनने 113 धावा केल्या, तर रवींद्र जडेजा 86 धावांवर बाद झाला. त्याला आज एकही धाव करता आली नाही. आकाश दीपने 17 आणि जसप्रीत बुमराहने 7 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून हसन महमूदने ५ बळी घेतले. मेहदी हसन मिराजला एक विकेट मिळाली. पहिल्या सत्रापर्यंत बांगलादेशने पहिल्या डावात 26 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत. कर्णधार नजमुल हुसेन शांतो आणि मुशफिकुर रहीम नाबाद आहेत. मोमिनुल हक शून्य आणि झाकीर हसन 3 धावा करून बाद झाले. या दोघांनाही आकाश दीपने बोल्ड केले. शादमान इस्लाम (2 धावा) पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारत-बांगलादेश कसोटीचे स्कोअरकार्ड