मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मराठी गाण्यावर एक तरुणी डान्समध्ये अतिशय अश्लिल हावभाव करताना दिसतेय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी तसंच लावणी कलावंतांकडून टीका होत आहे. गौतमी पाटील असं या डान्सर तरुणीचं नाव आहे. एका जाहीर कार्यक्रमात तिनं शेकडोंच्या उपस्थित असा अश्लिल डान्स केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या या अश्लिल ऑर्केस्ट्रांवर निशाणा साधाला आहे. अशा तरुणींमुळं लावणीला पुन्हा वाईट दिवस आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अश्लिल सादरीकरण करून जास्तीत जास्त पैसा कमवायचा हा एकमेव उद्देश या मुलींचा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. छातीवर पदर न घेतला डान्स करायचा आणि त्याला लावणी म्हणायची, हे अत्यंत चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
स्वप्निल जोशीनं दाखवलं त्याचं सर्वात आनंदाचं ठिकाण, चाहते म्हणतायत आम्हालाही इथे यायचंय!

अभिनेत्री आणि लावणी कलावंत मेघा घाडगे यांनी देखील गौतमी पाटील हिच्या डान्स आणि व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे. फेसबुकवर व्हिडिओ शेअर त्यांनी गौतमीविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गेली होती. लहान मुलं, महिलांसमोर अशा प्रकाराचं नृत्य करण्यांवर कडक करावाई करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलं होतं. या मुलींचा क्रार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना लाज तरी कशी वाटत नाही, असं म्हणत मेघा यांनी टीका केली आहे.

लावणी कलावंतांकडून टीका झाल्यानंतर गौतमीनं फामी मागितली होती. तिनं व्हिडिओ शेअर केला होता. पण काही तासांनी तिनं व्हिडिओ डिलिट केला. असं असलं तरी तिच्यावर प्रचंड टीका होत आहे.

हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचे आणखी व्हिडिओ व्हायरल होत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.