तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे म्हणतात, तेच ब्रह्म वाक्य:संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे म्हणतात, तेच ब्रह्म वाक्य:संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील. आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही. पण शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जात असतात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे म्हणतात, तेच ब्रह्म वाक्य ठरते. बाकी नेते इकडे तिकडे जाण्याचे काही बोलत असतील तर त्यावर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून काही दावा केल्यास त्यावर बोलता येईल. तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे म्हणतात, तेच ब्रह्म वाक्य ठरते. बाकी नेते इकडे तिकडे जाण्याचे कोणी काही बोलत असतील तर त्यावर बोलणार नाही. पण तिकडेही खूप अडथळे आहेत. कुठे शरद पवार तर कुठे उद्धव ठाकरे बसलेले आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले. येवल्यात माझाच विजय होणार
पुढे बोलताना छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील परिस्थीवर भाष्य केले. येवल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. पण येवल्यात पूर्वी काय होते? आता काय झाले, याबाबत माहिती असणाऱ्या मराठा समाजासह सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी मला मतदान केले. त्यामुळे येवला विधानसभा मतदारसंघात माझा विजय होणार, असा विश्वास भुजबळांनी केला. अनेक एक्झिट पोल्समध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत
राज्यात त्रिशंकू परिस्थिती होणार नसून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. काही एक्झिट पोल्सनी त्रिशंकू स्थिती होणार असल्याचे सांगितले असले, तरी अनेक एक्झिट पोल्सनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगितले आहे. आजही एक रिपोर्ट आलेला आहे, उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून येणार असल्याचे भुजबळ म्हणाले. काय म्हणाले होते संजय शिरसाट?
संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे व शरद पवार यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य केले होते. पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले होते की, शरद पवार यांच्यासोबत जायचे की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच घेतील. आम्हाला त्यावर भाष्य करता येणार नाही. पण शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जात असतात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही त्यांचा शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. एकनाथ शिंदे यांच्या प्रत्येक निर्णयाला आम्ही त्याला बांधिल आहोत. ते जिकडे जातील तिकडे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. आम्ही त्यांच्यासोबत अत्यंत मजबुतीने राहू, असे ते म्हणाले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment