छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याची सुधारणा होणार:राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, 9500 कोटींचा खर्च
पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या सुधारणेचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या कामावर सुमारे ९५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे ते शिरुर हा ५३ किमीचा मार्ग एमएसआयडीसीमार्फत सहापदरी करण्यात येणार आहे. यासाठी ७ हजार ५१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर अहमदनगर बाह्यवळण रस्तामार्गे छत्रपती संभाजीनगर रस्ता सुधारण्यासाठी २ हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शिरुर ते अहमदनगरपर्यंत टोल वसुली होत आहे. ती वसुली संपल्यानंतर हा मार्ग हस्तांतरित करण्यात येईल. अहमदनगर ते देवगड रस्ता सुधारण्यासाठी तो एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. तसेच देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोल वसुली होत आहे. ती संपल्यावर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. याशिवाय बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. या योजनेत नवीन सिंचन विहिरीस अडीच एेवजी ४ लाख तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस ५० हजारांऐवजी १ लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. इनवेल बोअरिंगसाठी ४० हजार तसेच यंत्रसामुग्रीसाठी ५० हजार रुपये आणि परसबागेकरिता ५ हजार अनुदान देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मिटर खोलींची, दोन सिंचन विहिरींमधील ५०० फूट अंतराची अटही रद्द करण्यात आली आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या १ लाख अनुदान देण्यात येते. आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. तुषार सिंचनासाठी सध्या २५ हजार रुपये देण्यात येतात. आता तुषार सिंचन संच ४७ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल. अशाच प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना ९७ हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल. मंत्रिमंडळाचे इतर निर्णय असे ३६ हजारांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना सौरऊर्जा संच देणार : स्वमालकीच्या ३६ हजार ९७८ अंगणवाडी केंद्रांना १ किलो वॅट क्षमतेचे सौर ऊर्जा संच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील. यासाठीच्या ५६४ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. औद्योगिक कामगार न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते मिळतील : १ जानेवारी २०१६ पासून हा निर्णय लागू करण्यास व त्याच्या थकबाकीपोटी ३७ कोटी ३ लाख ४२ हजार ७२३ रुपये देण्यास कार्योत्तर मान्यता मिळाली. ७ कोटी ५० लाख ४८ हजार ४०० रुपयांच्या मासिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. थकबाकी देणाऱ्या ३५ कुक्कुटपालन संस्थांना दंडव्याज माफ : राष्ट्रीय सहकार विकास निगमने अर्थसहाय्य केलेल्या पण सध्या अवसायनात न निघालेल्या ३५ सहकारी कुक्कुटपालन संस्थांकडील थकबाकी एकरकमी वसूल करून थकीत व्याज व दंडव्याज माफ होणार. या संस्थांकडील एकूण थकबाकी २४ कोटी ६९ लाख ८८ हजार आहे. सुकळीचे (ता. धारूर) खास बाब म्हणून पुनर्वसन यासाठी ११ कोटी ९३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील १५ हजार ४२० चौ. मीटर क्षेत्रावरील घरे रिकामी होणार असून ही जमीन महामंडळास वर्ग करण्यात येईल.