छत्रपतींनी मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर समुद्रात भगवा फडकवला:सुभान अलींचा दावा; मनसेची इस्लामीकरण सुरू असल्याची टीका

दंगल मुक्त महाराष्ट्र संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला, असे वक्तव्य सुभान अली यांनी केले आहे. सुभान अली म्हणाले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचे होते, तेव्हा सिंधूबंदी म्हणजेच समुद्र ओलांडल्याने पाप लागते या भावनेतून हिंदू सैनिक समुद्रात जायला तयार झाले नाही. अशा वेळेस मुस्लिम सैनिक आणि मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला. नागपूर येथे कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी सुभान अली बोलत होते. महाराजांचा कायदेशीर सल्लागार मुस्लिम होता
पुढे बोलताना सुभान अली म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे 31 सुरक्षारक्षक होते, त्यापैकी 20 सुरक्षारक्षक मुस्लिम होते. याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी मुस्लिम मावळ्यांना दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सव्वा लाख सैन्य होते. त्यांचा कमांडर नूर खान बेग हा मुस्लिम होता, शिवाजी महाराजांचा गनिमीकावा ज्या घोडदलावर अवलंबून होता, त्या घोडदलाचा कमांडर सिद्धी हिलाल हा मुस्लिम होता तसेच या घोडदलात 58 हजार घोडसवार हे देखील मुस्लिम होते. महाराजांचा कायदेशीर सल्लागार व खाजगी सचिव मौलाना काझी हैदर हा मुस्लिम होता. याचा काझी हैदरला स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश बनवले होते. तसेच महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख देखील मुस्लिम इब्राहिम खान होता. संत याकुत बाबा महाराजांचे गुरु होते
पुढे बोलताना सुभान अली म्हणाले, संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे इतरही काही गुरु होते. रत्नागिरी येथील संत याकुत बाबा या मुस्लिम संतांना देखील शिवाजी महाराजांनी आपले गुरु मानले होते. त्यानंतर तिथे मशिदीसाठी महाराजांनी याकुत बाबांना 653 एकर जागा दिली होती. हे सगळे असताना शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते, असे का बिंबवले जाते? असा प्रश्न देखील सुभान अली यांनी उपस्थित केला. सुभान अलींच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक
सुभान अली यांच्या वक्तव्यावर मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याचे इस्लामीकरण करण्याचा घाट सध्या सुरू आहे. याला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची साथ असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे हिंदू धर्मात समुद्र ओलांडू नये असे कुठेही म्हणलेले नाही. प्रभू श्रीराम हे समुद्र ओलांडूनच रावणावर सवार होऊन गेले होते. बाली, इंडोनेशिया व इतर देशांमध्ये हिंदू संस्कृती ही समुद्र ओलांडूनच गेली आहे. त्यामुळे सुभान अली यांच्या या विधानाला काहीही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हणले आहे. पुढे बोलताना महाजन म्हणाले, शहाजी राजे व सरफोजी राजे हे नावे मुस्लिम संत यांच्या नावावरून आलेली नाहीत, ती पूर्वीपासूनच अशी नावे ठेवलेली आहेत, असेही महाजन यावेळी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही त्यांना मुस्लिम धर्मीय म्हणून ठेवले नव्हते, ती स्वराज्याची लढाई होती. मनुवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय समुद्रात जाता येत नव्हते, हे खरे आहे. मात्र शिवाजी महाराजांनी सगळे निर्बंध धुडकावून समुद्रात प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्यासोबत काही प्रमाणात मुस्लिम मावळे देखील होते. पण सगळेच शंभर टक्के मुस्लिम होते असे नाही. पुढे संजय गायकवाड म्हणाले, याकुत बाबांना महाराज मानायचे आणि त्यामुळेच त्याकाळात याकुत बाबांना महाराजांनी मोठी जमीन दिली होती, असेही संजय गायकवाड म्हणाले.

​दंगल मुक्त महाराष्ट्र संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला, असे वक्तव्य सुभान अली यांनी केले आहे. सुभान अली म्हणाले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचे होते, तेव्हा सिंधूबंदी म्हणजेच समुद्र ओलांडल्याने पाप लागते या भावनेतून हिंदू सैनिक समुद्रात जायला तयार झाले नाही. अशा वेळेस मुस्लिम सैनिक आणि मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकवला. नागपूर येथे कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी सुभान अली बोलत होते. महाराजांचा कायदेशीर सल्लागार मुस्लिम होता
पुढे बोलताना सुभान अली म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे 31 सुरक्षारक्षक होते, त्यापैकी 20 सुरक्षारक्षक मुस्लिम होते. याचा अर्थ असा की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी मुस्लिम मावळ्यांना दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सव्वा लाख सैन्य होते. त्यांचा कमांडर नूर खान बेग हा मुस्लिम होता, शिवाजी महाराजांचा गनिमीकावा ज्या घोडदलावर अवलंबून होता, त्या घोडदलाचा कमांडर सिद्धी हिलाल हा मुस्लिम होता तसेच या घोडदलात 58 हजार घोडसवार हे देखील मुस्लिम होते. महाराजांचा कायदेशीर सल्लागार व खाजगी सचिव मौलाना काझी हैदर हा मुस्लिम होता. याचा काझी हैदरला स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश बनवले होते. तसेच महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख देखील मुस्लिम इब्राहिम खान होता. संत याकुत बाबा महाराजांचे गुरु होते
पुढे बोलताना सुभान अली म्हणाले, संत तुकाराम महाराज आणि जिजाऊ यांच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे इतरही काही गुरु होते. रत्नागिरी येथील संत याकुत बाबा या मुस्लिम संतांना देखील शिवाजी महाराजांनी आपले गुरु मानले होते. त्यानंतर तिथे मशिदीसाठी महाराजांनी याकुत बाबांना 653 एकर जागा दिली होती. हे सगळे असताना शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते, असे का बिंबवले जाते? असा प्रश्न देखील सुभान अली यांनी उपस्थित केला. सुभान अलींच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक
सुभान अली यांच्या वक्तव्यावर मनसेने विरोध दर्शवला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याचे इस्लामीकरण करण्याचा घाट सध्या सुरू आहे. याला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची साथ असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे हिंदू धर्मात समुद्र ओलांडू नये असे कुठेही म्हणलेले नाही. प्रभू श्रीराम हे समुद्र ओलांडूनच रावणावर सवार होऊन गेले होते. बाली, इंडोनेशिया व इतर देशांमध्ये हिंदू संस्कृती ही समुद्र ओलांडूनच गेली आहे. त्यामुळे सुभान अली यांच्या या विधानाला काहीही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हणले आहे. पुढे बोलताना महाजन म्हणाले, शहाजी राजे व सरफोजी राजे हे नावे मुस्लिम संत यांच्या नावावरून आलेली नाहीत, ती पूर्वीपासूनच अशी नावे ठेवलेली आहेत, असेही महाजन यावेळी म्हणाले. दरम्यान, या प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय गायकवाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही त्यांना मुस्लिम धर्मीय म्हणून ठेवले नव्हते, ती स्वराज्याची लढाई होती. मनुवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय समुद्रात जाता येत नव्हते, हे खरे आहे. मात्र शिवाजी महाराजांनी सगळे निर्बंध धुडकावून समुद्रात प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्यासोबत काही प्रमाणात मुस्लिम मावळे देखील होते. पण सगळेच शंभर टक्के मुस्लिम होते असे नाही. पुढे संजय गायकवाड म्हणाले, याकुत बाबांना महाराज मानायचे आणि त्यामुळेच त्याकाळात याकुत बाबांना महाराजांनी मोठी जमीन दिली होती, असेही संजय गायकवाड म्हणाले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment