जळगाव : शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयाच्या परिसरातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावलेल्या मागील बाजूस जुगाराचा अड्डा सुरू असल्याचं उघड झालं आहे. शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरुन या अड्डयावर पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज जळगाव दौरा आहे. त्याच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या मागे सुरू असलेल्या सट्ट्याच्या अड्डयावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा सट्ट्याच्या अड्डा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थक शिवसेना पदाधिकाऱ्याचा असल्याचा आरोप शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने केला असून यावरुन आता जळगावात उद्धव ठाकरे समर्थक आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष उफाळून आला आहे.

शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकारी शोभा चौधरी या रामेश्वर कॉलनी परिसरात राहतात. याच परिसरातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या जवळच बाळासाहेब ठाकरेंचे बॅनर लावले असून तिथं लोकांची गर्दी असल्याचे शोभा चौधरी यांना दिसून आले. चौधरी यांनी खात्री केली असता, शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या मागील बाजूस सट्टा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. शोभा चौधरी यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत सट्टा खेळणारे पसार झाले होते. किमान ४० ते ५० लोक असल्याचा दावा शिवसेना महिला पदाधिकारी शोभा चौधरी यांनी केला आहे.

सरकारमध्ये स्वत: देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे १०६ आमदार नाराज; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

शिवसेना संपर्क कार्यालयात हा सट्ट्याचा अड्डा सुरू होता, तसंच उद्धव ठाकरे समर्थक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा हा सट्ट्याचा अड्डा असल्याचा आरोपही शोभा चौधरी यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर लावून त्यामागे जर सट्टा खेळवला जात असेल तर हा बाळासाहेबांना मोठा अपमान असल्याचंही चौधरी यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde: गुन्हा दाखल झाल्यानंतर डुप्लीकेट CM एकनाथ शिंदे म्हणाले….

दरम्यान, रामेश्वर कॉलनीतील या सट्ट्याच्या अड्डयावर पोलिसांनी कारवाई केली असून अनिल लक्ष्मण माळी (वय-४३, रा. मोठा माळीवाडा, पाळधी खुर्द ता. धरणगाव) याच्यासह सट्टा पेढीमालक जावेद शेख सलीम या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.