औरंगाबाद: आंघोळीसाठी बकेटमध्ये हिटर टाकून तापत असलेल्या गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुकली गंभीररित्या भाजली होती. उपचारादरम्यान त्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना वाळूज औद्योगिक परिसरातील कमळापूर येथे घडली. श्रेया राजे शिंदे (वय – ४ वर्षे) असे चिमुकलीचे नाव आहे. (Mishap in

या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेश शिंदे हे मूळ परभणी जिल्ह्यातील असून रोजगारासाठी ते आई-वडील, पत्नी, मुलासाह वाळूज औद्योगिक वसाहतीत स्थायिक झाले. त्यांची पत्नी गरोदर असल्याने त्या माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे चार वर्षीय श्रेया वडिलांकडेच राहत होती.

आज सकाळी कुटुंबातील सर्वांनी सोबत जेवण केले. यानंतर श्रेया हात धुण्यासाठी मोरीत गेली आता तिचा पाय घासरला व ती जवळच हिटर लावलेल्या गरम पाण्याच्या बदलीत पडली. या घटनेत गंभीररित्या भाजली होती.तिला तातडीने घरच्यांनी रुग्णाल्यात हलविले उपचार सुरु असताना तिचा आज मृत्यू झाला.या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हसत खेळत सर्वांचं मनोरंजन करणारी चिमुकलीचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खेळता खेळता मासा गिळला, सहा महिन्यांच्या बाळाचा करुण अंत

अंबरनाथमध्ये गुरुवारी एका सहा महिन्यांच्या बाळाचाही एका दुर्दैवी घटनेत अंत झाला. अंबरनाथ पश्चिमेच्या उलन चाळ परिसरात ही घटना घडली. येथील सरफराज अन्सारी यांच्या सहा महिन्यांच्या शहाबाज या बाळाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला. गुरुवारी रात्री शहबाज हा इतर काही लहान मुलांसोबत खेळत होता. तेव्हा तो अचानक तडफडू लागला. इतर मुलं घाबरली आणि त्यांनी शहबाजच्या पालकांना याची माहिती दिली. शहाबाजच्या पालकांनी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले.

मात्र, तिथे शहाबाजवर उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर शहाबाजला उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत शाहबाजचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते. अखेर डॉक्टरांनी शहाबाजची बारकाईने तपासणी केल्यानंतर त्याच्या घशात मासा अडकल्याचे निदर्शनास आले. घशात मासा अडकल्याने त्याचा श्वास रोखला जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. मात्र, शवविच्छेदन झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *