जर शेअर मार्केट घसरला म्हणजे बाजारात मंदी राहिली तरी काही काळानंतर पुन्हा तेजी येते. एवढ्या सोप्या बाजारातही बहुतांश लोकांचे नुकसान होते असं का होतं आणि ते टाळण्यासाठी काय केले पाहिजे? आज तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.
शेअर बाजारात नुकसान कसं टाळायचं?
बाजारात असलेल्या चांगल्या शेअर्समध्ये दीर्घकालीन हेतूने गुंतवणूक केल्यास नुकसान होण्याची शक्यता कमी असते. परंतु पोर्टफोलिओमध्ये दिसणारा लाल रंग अल्पमुदतीच्या गुंतवणूकदारांना लहान प्रॉफिट बुक करण्यास भाग पाडतो. जर एखाद्याला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये कमी तोटा दिसला तर तो लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार नाही अशी शक्यता आहे. परंतु असं काय करावं जेणेकरुन तोटा जरी दिसत असला तरी तो लक्षणीयरीत्या कमी होईल किंवा नफा दिसत राहील? तुम्ही कॉकरोच पोर्टफोलिओ तयार केला असेल तर हे शक्य आहे.
कॉकरोच पोर्टफोलिओ म्हणजे काय?
शास्त्रतज्ञ म्हणतात की अणुबॉम्ब फुटला तर एक संपूर्ण ठिकाण नष्ट होईल, पण झुरळे जिवंत राहतील. असाच काहीसा मार्केट पोर्टफोलिओ तुम्हाला बनवायचा आहे जेणेकरून शेअर बाजारात अणुबॉम्ब देखील फुटला (कोसळला) तरीही तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला फारसा तोटा दाखवणार नाही.
अशा प्रकारच्या पोर्टफोलिओवर कोणत्याही दिशेने बाजाराच्या हालचालीचा फारसा परिणाम होत नाही. तसेच असा पोर्टफोलिओ वाढती महागाई व्याज दरांशीही ताळमेळ ठेवतो आणि त्याला ऑल-वेदर पोर्टफोलिओ असेही म्हणतात.
उदाहरणाने स्थिती समजून घ्या…
अलीकडच्या स्थितीच्या उदाहरणे आपण वरील स्थिती समजून घेऊया. अलीकडेच तुम्ही पाहिले की जगभरातील पुरवठा साखळी प्रभावित झाल्यामुळे बाजारात विशेषतः इक्विटी मार्केटमध्ये उलथापालथ झाली, परंतु याच वेळी डेट फंडांनी परतावा दिला. आता विचार करायचा तर जर एखाद्याने संपूर्ण कमाई इक्विटी मार्केटमध्ये केली असेल तर त्याला खूप मोठे नुकसान झाले असेल.
परंतु, जर एखाद्याने इक्विटीसह डेट फंडात गुंतवणूक केली असती तर त्याच्या पोर्टफोलिओने तोटा दाखवला नसता जे १९७० च्या दशकातही घडले होते. तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर व्याजदरात लक्षणीय वाढ झाली परिणामी अमेरिकेची अर्थव्यवस्थाही घसरत गेली.
बाजार तज्ञ काय म्हणतात
६०:४० च्या प्रमाणात बनवलेला पोर्टफोलिओ महागाईमुळे आलेल्या मंदीचा सामना करू शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. किंवा असे पोर्टफोलिओ अपुरे ठरेल असेही म्हणता येईल. अशा परिस्थितीत कॉकरोज पोर्टफोलिओ किंवा समान गुंतवणूक अशी तुमची गुंतवणूक पद्धत असली पाहिजे. गुंतवणूकदारांनी शेअर्स (इक्विटी), रोखे (बॉन्ड्स), रोख आणि कमोडिटीमध्ये समान गुंतवणूक करावी.
चार चतुर्थांश पध्दतीने गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ बराच सुरक्षित राहतो जो ६०:३० गुंतवणूक दृष्टिकोन पद्धतीपेक्षा चांगला आहे. विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा जागतिक स्तरावर अशांतता आहे आणि अनिश्चिततेची परिस्थिती अनिश्चित काळासाठी निर्माण केली जात आहे.