पुणे: वाढत्या प्रदूषणामुळे बांधकाम प्रकल्पांसाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार महामेट्रोलाही बांधकामांच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. स्वारगेट येथील मेट्रो हबमधील रेडी मिक्स काँक्रिट अर्थात आरएमसी प्लांटच्या ठिकाणी तीन दिवसांत २५ फूट पत्रे व हिरवी जाळी लावावी; अन्यथा काम थांबविण्याचा इशारा पालिकेतर्फे देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अवलियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; कोतवाल पक्ष्याचे छायाचित्र टिपले अन् मिळवला एफआयआयएन पुरस्कार
देशभर वाढत्या वायू प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पुणे महापालिकेनेही विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. निर्माणाधीन बांधकाम प्रकल्पांमुळे प्रदूषणात भर पडत असल्याचेही समोर आल्याने पालिकेने विविध प्रतिबंधात्मक नियम लागू केले आहेत. यात बांधकामाच्या चारही बाजूला २५ फूट पत्रे लावणे, साहित्याचे लोडिंग-अनलोडिंग करताना पाणी मारणे, बांधकामाभोवती हिरवी जाळी लावणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांनुसार या उपाययोजना तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

शहरात महामेट्रोतर्फे दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेसाठी स्वारगेट येथे मेट्रो हब उभारण्यात येत आहे. हे हब अत्यंत वर्दळीच्या जेधे चौकालगत असून, त्यासमोरच एसटी स्थानक आणि पीएमपी डेपोही आहे. या मेट्रो हबमध्ये भूमिगत मेट्रो स्टेशनसह वर बहुमजली व्यावसायिक इमारत उभारली जाणार आहे. हे काम वेगाने सुरू असून बांधकामासाठी आवश्यक काँक्रिट जागीच उपलब्ध व्हावे, यासाठी येथे रेडी मिक्स काँक्रिट प्लांट (आरएमसी) उभारण्यात आला आहे. हा प्लांट सातत्याने सुरू असतो.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटांची विरोधात घोषणाबाजी, कार्यकर्ते आमनेसामने

बांधकामासाठी आवश्यक साहित्य आणणाऱ्या वाहनांचीही येथे सातत्याने ये-जा सुरू असते. त्यामुळे प्रदूषणात भर पडत असल्याची तक्रार केली जात होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी महामेट्रोच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
मात्र, येथील कामाच्या भोवती पत्रे लावण्यात आले असले; तरी आरएमसी प्लांटलगत पत्रे लावलेले नाहीत. तसेच, हिरवी जाळीही लावलेली नाही. त्यामुळे येत्या तीन दिवसांत आवश्यक उपाययोजना न केल्यास येथील काम थांबविण्याचा इशारा महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी दिले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *