स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. 10 ऑगस्ट 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांना जीममध्ये वर्कआऊट करताना हृदय विकाराचा झटका आला. 58 व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या 42 दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती.

जीममध्ये वर्कआऊट करताना त्यांना छातीत दुखू लागलं. त्यावेळेस ते ट्रेडमिलवर वर्कआऊट करत होते. तब्बेत अचानक बिघडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. सतत ताप येत असल्यामुळे राजू श्रीवास्तव यांना व्हेटिंलेटरवर काढणे शक्य होत नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून ते एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज अखेर राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालवली. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन

​10 ऑगस्टला झाली अँजिओप्लास्टी

10-

बलून अँजिओप्लास्टी आणि पर्क्यूटेनियस ट्रान्सल्युमिनल अँजिओप्लास्टी म्हणूनही ओळखले जाते. ही प्रक्रिया धमनी एथेरोस्क्लेरोसिसमुळे होणार्‍या अवरोधित किंवा अरुंद धमन्या आणि शिरा रुंद करण्यासाठी वापरली जाते. अँजिओप्लास्टी प्रक्रियेमागील उद्देश रक्तवाहिनीमध्ये तयार झालेला फॅटी प्लेक तोडणे हा आहे आणि ज्यांच्या हृदयाचे कार्य आधीच धोक्यात आले आहे त्यांना शिफारस केली जाते. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

​वर्क आऊट करताना हृदय विकाराचा झटका

श्रीवास्तव यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराचा झटका आला त्या वेळी ते जिम वर्कआऊट करत होते. त्यांच्या चुलत भावाच्या म्हणण्यानुसार, तो नियमित व्यायाम करत असतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार ज्या प्रकरणांमध्ये रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांकडे दुर्लक्ष केले गेले किंवा निदान झाले नाही अशा प्रकरणांमध्ये व्यायामादरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना आढळून येत आहेत. काहीवेळा वर्कआउट्समुळे हृदयामध्ये विद्युत गडबड होऊ शकते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. कठोर व्यायामामुळे फॅटी प्लेक्स देखील फुटू शकतात ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

​15 दिवसांनी कोमातून आले बाहेर

15-

राजू श्रीवास्तव यांना हृदय विकाराचा झटका आल्यानंतर ते तब्बल 15 दिवस कोमात होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. राजू श्रीवास्तव 15 दिवसानंतर ते शुद्धीवर आले होते. यावेळी त्यांची जगण्याची उमेद दिसून येत होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

​झपाट्याने वाढतात हृदयविकाराच्या घटना

हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिअॅक अरेस्टची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. तरुणांमध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. हे टाळण्यासाठी त्याच्या जोखीम घटकांवर लक्ष ठेवले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच व्यायाम करताना किंवा जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकार येण्याच्या घटना देखील समोर येत आहेत.

​या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक

उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च रक्त कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. अशा लोकांनी त्यांच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे आणि योग्य काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

​हृदयविकाराच्या झटक्याने या कलाकारांचे निधन

अलीकडच्या काळात चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींना अचानक हृदयविकाराचा झटका आला आहे. यामध्ये आपले मराठी कलाकार प्रदीप पटवर्धन यांचा समावेश आहे. तसेच गायक केके यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आधी टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पुनीत राजकुमार, सुरेखा सिक्री, राज कौशल यांसारख्या अनेक सेलिब्रिटींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.