मुंबई : लोकप्रिय विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) याला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो चाहत्यांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. सुनील सध्या त्याच्या करिअरमध्ये खूप व्यग्र आहे. सुनील ‘द कपिल शर्मा शो’ कार्यक्रमात नसल्यानं त्याचे चाहते त्याला खूप मिस करत असले, तरी विविध माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करतो. तो कार्यक्रमात परतेल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. सुनील सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांसाठी मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत असतो. सुनीलनं अलिकडेच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हे वाचा-क्रिती-प्रभास रिलेशनशिपमध्ये? बी-टाऊनमध्ये ‘परमसुंदरी’ आणि ‘बाहुबली’चीच चर्चा!

काय आहे व्हिडिओ?

या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर रस्त्याच्याकडेला बसून ज्वेलरी विकताना दिसत आहे. जेव्हा एक महिला सुनीलकडे ज्वेलरी विकत घेण्यासाठी येते. या वस्तू कितीला विकणार असं ती सुनीला ज्वेलरीचा भाव विचारला. परंतु मला ही ज्वेलरी विकायची नाही. हे माझं पर्सनल सामान आहे, असं सांगत तो नकार देते. सुनीलनं हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यालाच हसू आवरत नाही आहे.

हे वाचा-वडिलांचं निधन आणि उद्ध्वस्त झालं कुटुंब; १९८४ च्या दंगलीत अभिनेत्रीने गमावलं सर्वकाही!

व्हिडिओ पाहून सर्वांना आलं हसू

सुनील जे सांगतो ते त्या महिलेला पटत नाही. ती एक ज्वेलरी उचलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा सुनील त्या बाईला तसं करण्यापासून रोखून तिच्यावर ओरडत म्हणतो की ‘सांगितलं ना माझं खासगी आहे हे. तुम्हाला कळत नाही का?’ सुनीलनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर त्याचे चाहते आणि कलाकार मंडळी भरभरून कमेंट करत आहेत. अर्चना पूरण सिंहपासून गायक हर्षदीप कौरसह अनेक सेलिब्रिटींनी सुनीलच्या या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, ‘ गुत्थीसाठी हे सारं खरेदी केलं आहे, हे नक्की.’ आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, ‘सुनील तू खूप कुल आहेस.’कधी छोले भटूरे तर कधी ऊसाचा रस विकताना दिसला सुनील

असं काही करण्याची सुनीलची ही पहिली वेळ नाही. याआधीही असंच काही अतरंगी गोष्टी विकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. याआधी सुनीलनं ऊसाचा रस, छोले कुल्चे विकतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. तर कधी सुनील उत्तराखंडमध्ये चहाच्या टपरीवर चहा पिताना आणि विकताना दिसला होता. तर कधी रस्त्याच्याकडेला बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांबरोबर दिसला होता. सुनीलच्या चाहत्यांना त्याचे हे अंदाज खूप आवडले आहेत.


दरम्यान, सुनील ग्रोव्हर लवकरच गुडबाय (Goodbuy) सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्यानं पुजाऱ्याची भूमिका केली आहे. त्याच्या हातात, गळ्यामध्ये अनेक माळा घातलेल्या दिसत आहेत. अलिकडेच गुडबाय सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. गुडबाय सिनेमा ७ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनमात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नीना गुप्ता (Neena Gupta), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) दिसणार आहेत. रश्मिका या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.