मुंबई : सराफा बाजारात सोन्याची घसरण सुरूच आहे. देशांतर्गत बाजाराबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारातही या कमोडिटीमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात दोन हजारांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ५१,००० च्या वर राहिला होता, आज ५० हजाराच्याही खाली आले आहेत.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे दर ३० रुपयांनी घसरून ४९,१४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. गेल्या सत्रात सोने ४९,१७५ रुपये प्रति तोळेवर बंद झाले होते. तर चांदीचे दर एमसीएक्सवर ५६,५५१ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत होते. अमेरिकी बाजारातही सोने चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली. अमेरिकेत सोन्याची ७.१० डॉलरने घसरण होऊन १६७१.१० डॉलर प्रति औंस नोंदवली गेली.

सोन्याचे दागिने किरकोळ विक्री दर
– २४ कॅरेट ४,९३७ रुपये प्रति ग्रॅम
– २२ कॅरेट- ४,८१८ रुपये प्रति ग्रॅम
– २० कॅरेट- ४,२९४ रुपये प्रति ग्रॅम
– १८ कॅरेट- ३,९९९ रुपये प्रति ग्रॅम
– १४ कॅरेट- ३,१८४ रुपये प्रति ग्रॅम

चांदी (९९९) – ५६,३५४ रुपये प्रति किलो

मुंबईतील सोन्याचे दर
देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सोने चांदीच्या दरांमध्ये असलेल्या अस्थिरतेचा परिणाम मुंबईतील सराफा बाजारातही दिसून आला. आज मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,९६० प्रति १० ग्रॅमच्या आसपास व्यवहार करीत होते तर चांदीचे दर ५६,६०० रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करीत होते.

खरेदीदारांसाठी संधी
सोन्याचे दर ५० हजारांच्या खाली आल्याने गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांसाठी सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. सोन्याच्या सर्वकालीन उच्चांक ५६ हजार प्रति तोळेच्या आसपास आहे. त्यामुळे आजच्या दरांप्रमाणे सोने सर्वकालीन उच्चांकापेक्षा तब्बल ६-७ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.