नवी दिल्लीःTRAI Validity Plan List : TRAI च्या आदेशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी एक महिन्याच्या वैधतेचे काही प्लान्स लाँच केले आहेत. एअरटेल, जिओ, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सर्व टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या काही दिवसात अशाच प्लान्सला आपल्या पोर्टफोलियोत जोडले आहे. हे सर्व प्लान्स एक महिने आणि ३० दिवसा सोबत येतात. ट्रायने सर्व कंपन्यांना कमीत कमी एक दोन असे प्लान्स जोडण्यास सांगितले होते. आता ट्रायने या प्लान्सची लिस्ट जारी केली आहे. यूजर्सच्या तक्रारीनंतर ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना अशा रिचार्ज प्लान्सची लिस्ट जारी करण्याचा आदेश दिला होता. याआधी जास्तीत जास्त प्लान्समध्ये फक्त २८ दिवसाची वैधता मिळत होती. परंतु, २८ दिवसाच्या वैधतेचे प्लान्स अजूनही उपलब्ध आहेत.

एअरटेलचे दोन प्लान्स
एअरटेलच्या पोर्टफोलियोत १२८ रुपये आणि १३१ रुपयाच्या दोन प्लान्सचा समावेश आहे. १२८ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला ३० दिवसाची वैधता मिळते. यात लोकल आणि एसटीडी कॉल्स २.५ पैसे प्रति सेकंद दराने मिळते. तर नॅशनल व्हिडिओ कॉल ५ पैसे प्रति सेकंद, डेटा ५० पैसे प्रति एमबी आणि एसएमएस १ रुपये या दराप्रमाणे मिळते. १३१ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला या सर्व सर्विस एका महिन्याच्या वैधते सोबत मिळतात.

BSNL आणि MTLN चे प्लान्स
३० दिवसाच्या वैधते सोबत बीएसएनएलचा रिचार्ज प्लान १९९ रुपयात मिळतो. तर एक महिन्याच्या वैधतेच्या प्लानची किंमत २२९ रुपये आहे. तर MTLN चे १५१ रुपये आणि ९७ रुपयाचे दोन प्लान्स ऑफर करते.

वाचाः पुढील ८ वर्षात स्मार्टफोन कुठेच दिसणार नाही, फोनची जागा हे प्रोडक्ट घेणार, बिल गेट्सची भविष्यवाणी

जिओचे प्लान्स
जिओने सुद्धा ट्रायच्या आदेशानंतर आपल्या पोर्टफोलियोत दोन प्लान्स जोडले आहेत. एका महिन्याच्या वैधतेचा जिओ प्लान २५९ रुपयात येतो. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला डेली १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स, डेली १०० एसएमएस, आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. ३० दिवसाच्या वैधतेचा प्लान २९६ रुपये किंमतीत येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना ३० दिवसाच्या वैधते सोबत अनलिमिटेड कॉल्स, डेली १०० एसएमएस मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.

वोडाफोन आयडियाचे प्लान्स
वोडाफोन आयडियाचा ३० दिवसाचा दिवसाचा प्लान १३७ रुपयाचा आहे यात यूजर्संना १० लोकल नाइट मिनिट्स, २.५ पैसे प्रति सेकंदाच्या रेटने कॉलिंग, १ रुपया आणि १.५ रुपयाच्या रेटने लोकल व एसटीडी एसएमएस बेनिफिट्स मिळते. एक महिन्यासाठी १४४ रुपये मोजावे लागतील.

वाचा: वाढताहेत Smartphone Blast च्या घटना, फोन वापरताना घ्या काळजी, आजच बदला ‘या’ १० सवयीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.