पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशात एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठका होत आहेत. तर पुण्यात सुद्धा भाजपने इलेक्शन मोड ऑन केला असून शहर भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत गणेशोत्सवाच्या आधी पुण्यातील भाजपची कार्यकारिणी विस्तार करण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारी नुकतीच धीरज घाटे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानंतर पुणे भाजपने शहरात संघटन वाढवण्यावर भर दिलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पुण्यातील भाजपची कार्यकारिणी विस्तार करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील गणेशोत्सवात देशभरातून भाविक पुण्यात येत असतात याचाच फायदा उचलत पुण्यात भाजपकडून निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात करण्याची रणनीती आखण्यात येत आहे. त्यामुळेच घाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गणेशोत्सवासाठी आमंत्रित केले आहे. यातून पुण्यात महायुतीकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

बापाची तब्येत बिघडली पण लेकीने हुंकार भरला, पप्पा आता आरक्षण घेऊनच घरी परतायचं, त्याशिवाय माघार नको!
तर दुसरीकडे १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय समितीची बैठक देखील होत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे अशी विनंती देखील या बैठकीत करण्यात आली आहे. दरम्यान, पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने हक्काचा मतदारसंघ गमवल्यानंतर भाजपने संघटन बांधणीवर भर दिल्याचे दिसत आहे. त्यातून आता लवकरच शहर कार्यकारिणीचा विस्तार देखील होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला भाजपने गणेशोत्सवापासूनच सुरूवात करण्याचा मानस आखला असून महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे.

तानाजी सावंतांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, शिंदेंच्या कानावर खबर, मुख्यमंत्र्यांकडून रातोरात बदल्या!
एकीकडे पुण्यात दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे भाजपचा चेहरा कोण? हा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत आहे. गिरीश बापट यांच्यासारखी ताकत असणारा आणि मास बेस असणारा नेता पुणे भाजपमध्ये कोण आहे याची चाचपणी भाजपमध्ये सातत्याने होत आहे. त्यामुळेच पुणे लोकसभेसाठी नक्की कोण उमेदवार द्यायचा यावर भाजपमध्ये एकमत होताना दिसत नाही. त्यातूनच अगदी माजी मुख्यमंत्री, माजी शहराध्यक्ष, माजी महापौरांपासून ते थेट अगदी पंतप्रधानांपर्यंत यांच्या नावाची पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. या सगळ्यामध्ये भाजपने आता आपली ताकद दाखवण्याची तयारी सुरु केली आहे.

महाराष्ट्रातल्या सह्याद्रीप्रमाणेच ते दिल्लीतले बादशाह, मोदी पुण्यातून लोकसभा लढणार? पुणेकरांच्या प्रतिक्रियाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *