काँग्रेस नेत्या म्हणाल्या- आमच्या पक्षात चित्रपटांसारखे कास्टिंग काऊच:वरिष्ठ नेत्यांच्या निकटवर्तीयांना संधी मिळते; केरळ काँग्रेसमधून हकालपट्टी
केरळ काँग्रेसच्या नेत्या रोजबेल जॉन यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, चित्रपटांसारखी कास्टिंग काऊचची परिस्थिती केरळ काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच पक्षात पुढे जाण्याची संधी मिळते. सिमी यांच्या या आरोपांनंतर, रविवार 1 सप्टेंबर रोजी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) सरचिटणीस एम लिजू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सिमी रोजबेल जॉन यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले आहे. केरळ काँग्रेसवर रोजबेल जॉन यांचे 3 आरोप हकालपट्टीनंतर सिमी म्हणाल्या- मी पक्षात महिलांचा आवाज बनून चूक केली काँग्रेसच्या आरोपांवर सिमी यांनी कोचीमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या- अलीकडे पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तीची हकालपट्टी करण्यात आली. कारण त्यांच्या व्यक्तीने सीपीआय(एम) सोबत कट रचला होता, परंतु त्याचा कोणताही पुरावा नाही. तसे असल्यास ते सार्वजनिक करावे. सिमी यांनी सांगितले- महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा लतिका सुभाष, के करुणाकरन यांची मुलगी पद्मजा वेणुगोपाल यांनाही बाहेर काढण्यात आले. स्वाभिमान असलेल्या महिला काँग्रेसमध्ये काम करू शकणार नाहीत. मलाही काढून टाकण्यात आले. महिलांचा आवाज बनून मी चूक केली. व्हीडी साठेसन कुणाला घाबरत नाहीत. माझ्यासह अनेक लोक आता वेगवेगळ्या पदांवर आहेत. आता रस्त्यावर चालायला भीती वाटते. मला काहीही होऊ शकते. केरळ काँग्रेस प्रमुख म्हणाले- सिमींचे आरोप निराधार आहेत केरळ काँग्रेसचे प्रमुख के सुधाकरन म्हणाले, “महिला काँग्रेसने सिमी रोजबेल जॉनच्या आरोपांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सिमीने नेत्यांवर चुकीची टिप्पणी केली आहे. तिचे आरोप निराधार आहेत. KPCC महिला काँग्रेसच्या तक्रारीची चौकशी करेल.