काँग्रेसच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे:’अति आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो’; दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान

काँग्रेसच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे:’अति आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो’; दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत राज्यातील नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील राज्यातील नेत्यांचे मनोबल उंचावले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील असेच यश पक्षाला मिळेल, अशी आशा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधील जागा वाटपात जास्तीत जास्त जागा मागण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र नेत्यांमधील अति आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो. त्यामुळे सध्या सबुरीने घेण्याचा सल्ला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिला आहे. नाना पटोले यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा विरोध आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने देखील सध्या याबाबत घाई करण्यात अर्थ नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे नागपूर काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची कान टोचले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… परतीचा पाऊस पुन्हा झोडपणार:संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर मान्सून परतीच्या प्रवासाला असताना महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत आणि उपनगरात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई, पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील शाळांना तसेच महाविद्यालयांना शासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत राज्यातील नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला राज्यामध्ये चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील राज्यातील नेत्यांचे मनोबल उंचावले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील असेच यश पक्षाला मिळेल, अशी आशा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मधील जागा वाटपात जास्तीत जास्त जागा मागण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र नेत्यांमधील अति आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो. त्यामुळे सध्या सबुरीने घेण्याचा सल्ला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिला आहे. नाना पटोले यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करायला काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचा विरोध आहे. शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने देखील सध्या याबाबत घाई करण्यात अर्थ नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे नागपूर काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांनी नाना पटोले यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची कान टोचले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… परतीचा पाऊस पुन्हा झोडपणार:संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा; तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर मान्सून परतीच्या प्रवासाला असताना महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुंबई आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबईत आणि उपनगरात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई, पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील शाळांना तसेच महाविद्यालयांना शासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना देखील आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment