पर्युषण पर्वकाळात पशुहत्या, मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याबाबत विचार करा:31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्व; मुंबई हायकाेर्टाचे मुंबई, नाशिक पालिकेला निर्देश
जैन समुदायाच्या पर्युषण पर्वकाळात ८ दिवसांच्या कालावधीत पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका जैन समुदायाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात अाली अाहे. पर्युषण पर्व तोंडावर असल्याने नाशिक, मुंबई, पुणे पालिकांनी यावर विचार करून तत्काळ निर्णय घ्यावा असे निर्देश न्यायालयाने दिले अाहेत. मुंबईच्या शेठ मोतीशाॅ लालबाग जैन चॅरिटीज ट्रस्टने याबाबत याचिका दाखल केली अाहे. पर्युषण पर्व ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत आहे. या काळात पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली अाहे. बंदी नसल्यास पर्युषण पर्वाच्या काळात जैन समुदायावर पशुहत्या आणि मांसविक्री पाहण्याची वेळ येते असे याचिकेत म्हटले आहे. यावर पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याबाबत महापालिकांनी विचार करून तत्काळ निर्णय घ्यावा असे निर्देश काेर्टाने दिले. झोपडपट्टीवासीयांची पाणीपट्टी वाढवता, मग श्रीमंत क्रिकेट मंडळाला शुल्कमाफी कशासाठी ? : खंडपीठ मुंबई | झोपडपट्टीवासीयांवरील पाणीपट्टी वाढवता, मग जगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट मंडळास शुल्क माफी कशासाठी? असा परखड सवाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्या.अमित बोरकर यांच्या खंडपीठाने केला. राज्य शासनाने अायपीएल सामन्यांपोटी पोलिस बंदोबस्तासाठी वसूल करण्यात येणाऱ्या शुल्कात कपात केली असून ती सन २०११ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे. मंडळाकडे सन २०१३ ते १८ कालावधीतील अायपीएल सामन्यांच्या १४.८२ कोटी रकमेच्या थकबाकी मंडळाकडे आहे.याप्रकरणी जनहित याचिका दाखल झाली आहे.