आमदार देवेंद्र भुयार यांचे महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य:महिलांची टिंगल करणे हाच काय अजेंडा आहे का हे अजितदादांना विचारावे लागेल- सुषमा अंधारे

आमदार देवेंद्र भुयार यांचे महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य:महिलांची टिंगल करणे हाच काय अजेंडा आहे का हे अजितदादांना विचारावे लागेल- सुषमा अंधारे

अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल बादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, महिलांची टिंगल करणे हाच काय तो यांचा अजेंडा आहे का हे अजित पवारांना विचारले पाहिजे. नेमके भुयारांचे वक्तव्य काय? आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, एक नंबर स्मार्ट मुलगी हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांना भेटत नाही, ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी ही कुणाचा व्यवसाय असेल तर त्याला मिळते अन् 3 नंबरचा जो गाळ गाळ शिल्लक राहिला… ती पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचे काही खरं राहिले नाही. शेतकऱ्यांचे जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेबळ हबळंच निघत राहते. माय इल्लू पिल्लू अन त्यांच्या पोटी वानरांचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे आपला सगळा. मस्तवाल पणातून हे वक्तव्य सुषमा अंधारे म्हणाल्या की, भुयार यांचे वक्तव्य हे केवळ महिलांची अपमान करणारे आहे असे नाही. हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडवण्यासारखे आहे. परंतू सध्या शिंदे गट, अजित पवार गटांचे लोक असतील हे बोलण्याचे तारतम्य पाळत नाही. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला पोलिस किंवा कुणी काहीही शिक्षा किंवा कारवाई करू शकत नाही या मस्तवालपणातून हे वक्तव्य होत आहे.
दोन वर्षांपूर्वीदेखील भुयारांचे वक्तव्य चर्चेत दोन वर्षांपूवी बोलताना देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना धक्का लावला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही. जूना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही, असा दम विरोधकांना भरला होता. त्यांच्या या वक्तव्याची त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

​अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल बादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. दरम्यान आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, महिलांची टिंगल करणे हाच काय तो यांचा अजेंडा आहे का हे अजित पवारांना विचारले पाहिजे. नेमके भुयारांचे वक्तव्य काय? आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, एक नंबर स्मार्ट मुलगी हवी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्यांना भेटत नाही, ती नोकरीवाल्याला भेटते. दोन नंबरची मुलगी ही कुणाचा व्यवसाय असेल तर त्याला मिळते अन् 3 नंबरचा जो गाळ गाळ शिल्लक राहिला… ती पोरगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते. म्हणजे शेतकऱ्यांच्या पोराचे काही खरं राहिले नाही. शेतकऱ्यांचे जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेबळ हबळंच निघत राहते. माय इल्लू पिल्लू अन त्यांच्या पोटी वानरांचे पिल्लू असाच कार्यक्रम आहे आपला सगळा. मस्तवाल पणातून हे वक्तव्य सुषमा अंधारे म्हणाल्या की, भुयार यांचे वक्तव्य हे केवळ महिलांची अपमान करणारे आहे असे नाही. हे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची टिंगल उडवण्यासारखे आहे. परंतू सध्या शिंदे गट, अजित पवार गटांचे लोक असतील हे बोलण्याचे तारतम्य पाळत नाही. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला पोलिस किंवा कुणी काहीही शिक्षा किंवा कारवाई करू शकत नाही या मस्तवालपणातून हे वक्तव्य होत आहे.
दोन वर्षांपूर्वीदेखील भुयारांचे वक्तव्य चर्चेत दोन वर्षांपूवी बोलताना देवेंद्र भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना धक्का लावला तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही. जूना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही, असा दम विरोधकांना भरला होता. त्यांच्या या वक्तव्याची त्यावेळी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment