या क्रिकेट सामन्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आकाश रवींद्र वाटेकर असे आहे. आकाश हा लॉ कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याने अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि त्या क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता हा सामना सुरु होता. महाविद्यालयाच्या मैदानावर गोलंदाजी करत दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याला शारीरिक त्रास सुरू झाला. याबाबत त्याने मित्रांना सांगत गोळी मागितली. गोळी घेतल्यानंतर त्याला बरे वाटू लागले. त्याने पुन्हा मैदानात येऊन गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र सायंकाळी साडेचारच्या दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानातच खाली कोसळला. मैदानावरील मित्राने तात्काळ त्याला उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याला उपचारासाठी विलंब झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा: Women’s IPL: महिला आयपीएल संघांच्या मालकांची घोषणा, BCCI ने ५ संघ ४६७० कोटींना विकले
रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासणी करत त्याला मृत घोषित केले. आकाशच्या आकस्मित निधनाने त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या पश्चात वडील, बहिण, भाचा असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबासह मित्रपरिवारावर देखील शोककळा पसरली आहे. या धक्कादायक घटनेनंतर महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे.