कोणावर किती गुन्हे?
– लोकसभा व राज्यसभेतील एकूण ७७६ लोकप्रतिनिधींपैकी ७६३ लोकप्रतिनिधींच्या प्रतिज्ञापत्रांतील माहितीच्या आधारे ‘एडीआर’ व ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ या संस्थांनी ही आकडेवारी दिली आहे.
– यातील ४० टक्के विद्यमान खासदारांवर गुन्हे दाखल. त्यापैकी २५ टक्के खासदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न करणे, अपहरण व अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे या अहवालातून स्पष्ट.
– केरळमधील २९पैकी २३ खासदारांवर गुन्हे दाखल. यामध्ये लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचा समावेश.
– बिहारमधील ५६पैकी ४१, महाराष्ट्रातील ६५पैकी ३७, तेलंगणातील २४पैकी १३, दिल्लीतील १०पैकी पाच खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात दोन्ही सभागृहांतील खासदारांचा समावेश आहे.
– भाजपच्या एकूण ३८५ खासदारांपैकी १३९ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे, तर काँग्रेसच्या ८१ खासदारांपैकी ४३ खासदारांविरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत.
– अन्य पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेस ३६पैकी १४, राष्ट्रीय जनता दल सहापैकी पाच, ‘माकप’ आठपैकी सहा, आम आदमी पक्ष ११पैकी तीन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आठपैकी तीन याप्रकारे गुन्ह्यांची नोंद आहे.
– सुमारे ११ विद्यमान खासदारांवर हत्येप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, तर ३२ खासदारांविरोधात हत्येचा प्रयत्न करणे या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद आहे.
– महिलांच्या प्रकरणी गुन्ह्यांची नोंद झालेल्या खासदारांची संख्या २१ आहे. यापैकी चार खासदारांविरोधात बलात्काराचा आरोप आहे.
कोण, किती श्रीमंत?
– लोकसभा व राज्यसभेतील खासदारांची सरासरी मालमत्ता ~ ३८.८३ कोटी, तर एकूण ५३ खासदार अब्जाधीश असल्याची नोंद.
– सर्वाधिक श्रीमंत खासदार तेलंगणमधील आहेत. या खासदारांची सरासरी मालमत्ता ~ २६२.२६ कोटी आहे.
– यानंतर आंध्र प्रदेश (~ १५०.७६ कोटी) आणि पंजाब (~ ८८.९४ कोटी) यांचा क्रमांक येतो.
– लक्षद्वीपच्या एकमेव खासदाराची मालमत्ता सर्वांत कमी, म्हणजे ~ ९.३८ लाख आहे. त्रिपुरा व मणिपूर (प्रत्येकी तीन खासदार) येथील खासदारांची सरासरी मालमत्ता अनुक्रमे ~ १.०९ कोटी व ~ १.१२ कोटी आहे.
– भाजपच्या खासदारांची सरासरी मालमत्ता ~ १८.३१ कोटी, तर काँग्रेसच्या खासदारांची सरासरी मालमत्ता ~ ३९.१२ कोटी आहे.